Akshay Kumar suggested diet plan for karan johar जेव्हापासून मी हे खातोय मला माझ्यातच खूप फरक दिसू लागला आहे. माझी स्कीनही खूप तजेलदार झालीय.Farah Khan,Manish Malhotra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar

करण जोहरचा डायटेशियन आहे बॉलीवूडचा 'हा' सुपरस्टार

sakal_logo
By
प्रणाली मोरे

करण जोहर वयाच्या पन्नाशीतही स्वतःला फीट ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेताना दिसतोय. मग त्याच्या डाएटपासून ते स्टायलिंगपर्यंत सर्वच बाबतीत त्याने घेतलेले प्रयत्न दिसून येतात. अर्थात बाकी सगळं ठीक असलं तरी त्याच्या स्टायलिंगवरनं अनेकदा तो ट्रोलही झालाय. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर त्याच्यावर नेपोटिझमचा आरोपही झाला आणि अगदी त्याच्या कुठल्याही गोष्टीवर टीका करण्याचा नेटक-यांनी चंगच बांधला.

करण जोहर सध्या आपले इंडस्ट्रीतले बेस्ट फ्रेंड्स फराह खान आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा करतोय. फराह या सिनेमातील गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करतेय. तब्बल नऊ वर्षांनंतर करण आणि फराह सिनेमासाठी एकत्र आले आहेत. "मी नृत्यदिग्दर्शन करताना गाणी खूप विचार करून निवडते. पण काही नाती अशी असतात जी कामाच्या पलिकडे असतात. माझं आणि करणचं,मनिषचं नातं असंच आहे. आणि म्हणूनच मी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करतेय."

Karan Johar,Akshay Kumar

Karan Johar,Akshay Kumar

या सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा फराहने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तिने करण जोहरचा ब्रेकफास्ट करतानाचा एक फोटो शेअर करीत पोस्टमध्ये लिहिलंय,"करणला जेव्हा विचारलं की या वयातही तुझं तरुण दिसायचं रहस्य तु जे खातोस त्यात दडलंय का? तर करण म्हणाला "हो,हा माझा ब्रेकफास्ट आहे. हेल्दी खूप सारे पदार्थ एकत्र करून बनवलेला. मला अक्षय कुमारने हे डाएट दिलेले आहे. जेव्हापासून मी हे खातोय मला माझ्यातच खूप फरक दिसू लागला आहे. माझी स्कीनही खूप तजेलदार झालीय ते मी खूप हेल्दी पदार्थ खात असल्यामुळे." या फराहने शेअर केलेल्या फोटोवर रणवीर सिंगपासून अनेक सेलिब्रिटींनी चांगल्या कमेंटस् दिलेल्या आहेत.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात काम करतायत. याच सिनेमात अभिनेते धर्मेंद्र,अभिनेत्री जया बच्चन,शबाना आझमी असे ज्येष्ठ कलाकारही काम करीत आहेत. सध्या या सिनेमाचं दिल्लीत शुटिंग सुरू आहे.

loading image
go to top