अक्षय आईला घेऊन गेला जगातील 'त्या' फेवरेट ठिकाणी

वृत्तसंस्था
Wednesday, 22 January 2020

बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने म्हणजेच अक्षयने त्याच्या आईला वाढदिवसाचं अनोखं गीफ्ट दिलं आहे. 

मुंबई : बॉ़लिवूडमध्ये बर्थडे सेलिब्रेशन हे नेहमीच धुमधडाक्यात केलं जातं. मोठ मोठ्या पार्ट्या असतात आणि त्यामध्ये सर्व कलाकार सहभागी होतात. तर, कधी महागडे गीफ्ट घेऊन ही मंडळी सेलिब्रेशन करतात. काहीजण वाढदिवसानिमित्त परेशात जातात. पण, बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने म्हणजेच अक्षयने त्याच्या आईला वाढदिवसाचं अनोखं गीफ्ट दिलं आहे. 

अक्षय कुमार वर्षभरात अनेक सिनेमे करतो आणि त्यामुळे तो एक बिझी कलाकार आहे. पण, अक्षयची एक खासियत आहे. ती अशी की, कितीही बिझी वेळापत्रकातून तो कुटुंबासाठी आवर्जुन वेळ काढतो. कामासोबत कुटुंबालाही तितकाच वेळ देतो. त्याच्या या वागण्याचं कौतुक अख्खं बॉलिवूड करतं. मनोरंजन क्षेत्रामध्ये कलाकार महिनाभर शुटिंगमध्ये व्यस्त असतात. तरीही अक्षयने वेळ काढून त्याच्या आईचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. 

अक्षयची आई म्हणजेच अरुणा भाटीया यांचा वाढदिवस अक्षयने सिंगापूरमध्ये साजरा केला आहे.त्याचा व्हिडीओही त्याने शेअर केला. सिंगापूरच्या एका कसिनोमध्ये अक्षय आईला घेऊन गेला. अरुणा यांचे कसिनो हे ठिकाण अत्यंत आवडीचे आहे. त्यांच्या आवडीचे भान राखत अक्षयने वाढदिवसाच्या खास दिवशी इच्छा पूर्ण केली आहे. 
काही दिवसांपूर्वी त्याने अरुणा यांना लंडनची सफर करवली. व्हिलचेअर बसलेल्या आईला अक्षयने स्वत: पिरवले. त्यावेळचा एक व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ''लंडनमध्ये आईसोबत वेळ घालवत आहे. आयुष्यात कितीही व्यस्त असलो तरी आई-वडिलांसाठी शक्य तितका वेळ द्या. त्यांचे वय वाढत आहे याचे भान ठेवा.''
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar takes mother to her favourite place in the whole world on her birthday