esakal | तांडव झाला ट्रोल, हिंदू देवतांची केली बदनामी; पहिली 15 मिनिटे फारच वादग्रस्त 
sakal

बोलून बातमी शोधा

 tandav new web serise news

तांडव या मालिकेतून हिंदू देव देवतांचा अपमान झाल्याची कडवट प्रतिक्रिया नेटक-यांनी दिली आहे.

तांडव झाला ट्रोल, हिंदू देवतांची केली बदनामी; पहिली 15 मिनिटे फारच वादग्रस्त 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भारतात प्रदर्शित होणा-या बहुतांशी मालिका आणि चित्रपट यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली नको त्या गोष्टी सादर करुन जनमाणसांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात  असल्याचे दिसून आले आहे. आज तांडव ही चर्चेत असणारी मालिका प्रदर्शित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना होती. मालिका पाहून त्यातील काही गोष्टींवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

तांडव या मालिकेतून हिंदू देव देवतांचा अपमान झाल्याची कडवट प्रतिक्रिया नेटक-यांनी दिली आहे. मालिकेच्या माध्यमातून जेएनयुचे केलेले समर्थन, देवतांच्या तोंडी घातलेले वादग्रस्त संवाद यामुळे त्यावर नेटक-यांनी तोंडसुख घेतले आहे. क्रिएटिव्हीटी आणि कलेच्या नावाखाली प्रोप्रगंडा करण्याचे काम सुरु केले आहे. ते कृपया थांबविण्याची गरज आहे. पहिल्या भागातील 20 मिनिचे पाहिल्यानंतर मालिकेत काय आहे याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. एका वेगळ्या प्रकारचा प्रपोगंडा करण्याचे काम यानिमित्तानं केले जात आहे असेही नेटक-यांनी म्हटले आहे.

मोदीभक्तांनी नेहमीप्रमाणे आपल्या टीकेला सुरुवात केल्याचे म्हटले आहे. आपल्या मनासारखी एखादी कलाकृती नसेल तर ती कलाकृती बॉयकॉट करण्यास सांगितले जाते. अशा स्वरुपाचे विचारही व्यक्त केले जात आहे. सध्या सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग आहे. भगवान शंकर यांची भूमिका करुन अशोभनीय शब्दांचा वापर करणे हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा या मालिकेचा दिग्दर्शक अली अब्बास आणि मुख्य भूमिकेत सैफ अली खान असतो. एवढया टोकाची मतेही सोशल माध्यमांवर व्यक्त केली जात आहे.

जास्त स्वातंत्र्य म्हणजे जास्त व्याभिचार अशी रोखठोक भूमिकाही काही ट्रोलर्सनं घेतली आहे. अली अब्बास झदार हे या मालिकेचे दिग्दर्शक असुन त्यांनी प्रपोगंडाच्या नावाखाली ही मालिका प्रदर्शित केली आहे. पहिल्या 15 मिनिटांमध्ये अभिनेता झिशान आयुब हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा करणारा तरुण भगवान शंकराच्या भूमिकेत वावरताना दिसला आहे. त्यानं यावेळी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. फिर्यादी हा नेहमी मुस्लिम दाखवणे, हिंदू देवतांचा अपमान करणे, जेएनयु सारख्या विद्यापीठांचा पुरस्कार करणे, यासारख्या न पटणा-या गोष्टी मालिकेत दाखविण्यात आल्यानंतर सोशल माध्यमांवर त्यावरुन टीका सुरु झाली आहे. 
 
 

loading image
go to top