'मिस्टर इंडिया'च्या फिमेल वर्जनला मिळालं शिर्षक, कतरिना असेल मुख्य भूमिकेत?

katrina
katrina

मुंबई- अभिनेता सलमान खानच्या 'सुल्तान', 'टायगर जिंदा है', 'भारत' सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे सुपरहिट दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या आगामी सिनेमातील अडचणी आता दूर होताना दिसत आहेत. या सिनेमाची हिरोईन म्हणून त्यांनी आधीच सलमानची खास मैत्रीण कतरिना कैफच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच सिनेमाच्या शूटींगसाठी लोकेशन देखील आता ठरवून झालं आहे. विशेष म्हणजे अली अब्बास जफरने या सिनेमाच्या शिर्षकाचा देखील विचार करुन ठेवला आहे. 

दिग्दर्शक अली अब्बास जफर एक सुपर हिरो फ्रँचायजी सिनेमा बनवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत ज्याची सुरुवात ते आता कतरिना कैफच्या सिनेमाने करणार आहे. झी स्टुडिओसोबत बनणा-या सिनेमाचं कथानक काहीसं अनिल कपूर यांच्या 'मिस्टर इंडिया' या हिट सिनेमावर आधारित असणार आहे. सिनेमाचे अधिकार झी समुहाने बोनी कपूर यांच्याकडून आधीच खरेदी केले आहेत. अली अब्बास यांचा हा सिनेमा देशातील असा सुपर हिरो सिनेमा असेल ज्यामध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री साकारेल. या

सिनेमावर गेल्या अनेक वर्षांपासून अली काम करत आहेत. या सिनेमाचं शिर्षक अलीने 'सुपर सोल्जर' असं ठरवलं होतं आणि दुबईत शूटींगसाठी याचे लोकेशन पाहिले होते. अली त्याच्या या आगामी सिनेमाचं शूटींग अबु धाबी, दुबई, पोलँड, जॉर्जिया आणि उत्तराखंडमध्ये करणार असल्यातं कळतंय. एका मुलाखती दरम्यानन अलीने सांगितलं होतं की त्यांच्या या सिनेमात कोणताच हिरो नसेल.

'सुपर सोल्जर' हा सिनेमा महिला सुपरहिरो या कल्पनेवर आधारित असेल. कतरिना या सिनेमात मार्शल आर्ट्स करताना दिसेल जे शिकण्याची तिने तयारी देखील सुरु केली आहे.कतरिना 'फोनभूत', 'टायगर ३' या सिनेमांची शूटींग संपल्यावरच अलीला तिच्या तारखा देणार आहे. अली अब्बास यांच्यासोबत कतरिनाचा हा चौथा सिनेमा असेल.   

ali abbas zafar female version of mr india super soldier starring katrina kaif will shoot in dubai  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com