Alia Bhatt Birthday : अभिनेत्री होण्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं? आलियाकडंच बघा.. ती 'एवढंच' शिकलीये! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 alia bhatt, alia bhatt birthday, alia bhatt education

Alia Bhatt Birthday : अभिनेत्री होण्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं? आलियाकडंच बघा.. ती 'एवढंच' शिकलीये!

Alia Bhatt Birthday: आज स्वप्नसुंदरी आलिया भटचा वाढदिवस आहे. आलीया आज ३० वर्षांची झालीय. आलियाने आजवर या एक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

करियरच्या सुरुवातीच्या काळात आलियाला तिच्या अभिनयावरून फॅन्सकडून टीकेचा भडीमार सहन करावा लागला. पण आज मात्र आलीया भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

(alia bhatt education)

आलिया भटला लहानपणापासून अभिनत्री व्हायचं होतं. इतकंच नव्हे तर अभिनेत्री होण्यासाठी आलियाने शिक्षण अर्धवट सोडलं होतं. आलीयचं शिक्षण किती झालंय हे पाहून तुम्ही चकितच व्हाल.

आलिया भट्टने तिचे शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूलमध्ये पूर्ण केलंय. लहानपणापासून आलियाने बाबा महेश भट निमित्ताने घरातच फिल्म विषयक वातावरण पाहिलं होतं.

आलिया पुढे शाळेत शिकायला लागली. जमनाबाई नरसी स्कूलमध्ये आलियाने दहावी पर्यंत शिक्षण घेतलं. पण शिक्षणापेक्षा आलियाचा कल अभिनयाकडे जास्त होता.

त्यातच लहानपणापासून आलियाने बाबा महेश भट निमित्ताने घरातच फिल्म विषयक वातावरण पाहिलं होतं. १० वी पूर्ण करून आलिया पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये गेली. परंतु आलियाचं शिक्षणात मन रमत नव्हतं.

त्यामुळे अभिनेत्री होण्यासाठी आलियाने कॉलेज सोडलं. आलियाने १२ वी सुद्धा पूर्ण केली नाही. आलिया फक्त १० वी पास होते. आलियाला १० वीत ७१ टक्के मार्क्स मिळाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अखेर मॅटर्निटी ब्रेक नंतर कामावर परतली आहे. आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या काश्मीर शेड्यूलसह ​​पुन्हा कामाला लागली आहे.

आलियाने तिचा दीर्घकाळचा जोडीदार, अभिनेता रणबीर कपूर याच्याशी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्याने त्यांचे पहिले बाळ, मुलगी राहाचे स्वागत केले.

आलिया भट्ट लवकरच रणवीर सिंग सोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय, ती लवकरच कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल अशी शक्यता आहे.