Alia Bhatt: हाय मेरी परमसुंदरी..! Met Gala 2023 फॅशन शो मध्ये 'गंगुबाई'चा जलवा...

आलिया मेट गाला इव्हेंट मध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत होती
 alia bhatt, alia bhatt at met gala 2023, met gala, met gala 2023, alia bhatt news
alia bhatt, alia bhatt at met gala 2023, met gala, met gala 2023, alia bhatt newsSAKAL

Alia Bhatt at Met Gala 2023 News: RRR फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिने या वर्षी मेट गालामध्ये पदार्पण केले.मेट गाला हा जागतिक फॅशन इव्हेंट आहे. या वर्षी आलीया प्रथमच मेट गाला इव्हेंट मध्ये सहभागी झाली होती.

आलिया मेट गाला इव्हेंट मध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत होती. आलियाने या इव्हेंटसाठी एका आकर्षक पांढऱ्या गाऊनची निवड केली होती.

(Alia Bhatt caught the attention of Hollywood at the Met Gala 2023 fashion show)

 alia bhatt, alia bhatt at met gala 2023, met gala, met gala 2023, alia bhatt news
TDM ला थिएटरमध्ये शो मिळेना.. दिग्दर्शक अन् कलाकार सर्वांसमोर हात जोडून रडले, व्हिडिओ व्हायरल
 alia bhatt, alia bhatt at met gala 2023, met gala, met gala 2023, alia bhatt news
Sairat: इतिहास घडवणाऱ्या 'सैराट'ला झाली ७ वर्ष, बघा कधीही न पाहिलेले फोटो

इव्हेंटसाठी, आलियाने मोत्यांनी सजवलेला स्लीव्हलेस पांढरा गाऊन निवडला. तिने अंगठ्या आणि कानातल्यांसह अनेक दागिने सुद्धा परिधान केले होते.

फोटोंमध्ये, आलियाने पापाराझींसाठी पोज देताना वेगवेगळे एक्सप्रेशन्स दिलेले दिसत आहेत. आलियाची बहीण शाहीन भट्टने या कार्यक्रमातील आलियाचे फोटो शेयर करत पोस्टला कॅप्शन दिले, "एंजल."

या फोटोंवर प्रतिक्रिया देताना, एका फॅनने लिहिले, "खूप सुंदर आणि आश्चर्यकारक" एकाने लिहिले, "व्वा, ती खूप सुंदर आहे, मी निःशब्द आहे." दुसरी व्यक्ती म्हणाली, "गर्वाचा क्षण." अशा कमेंट करत फॅन्सनी आलियाच्या लूकला पसंती दर्शवली आहे.

आलियाचं मेट गालामध्ये जाण्याचं निमित्त खास आहे. आलिया हार्ट ऑफ स्टोनमध्ये (Heart of Stone) या हॉलिवूड सिनेमात पदार्पण करणार आहे.

टॉम हार्परने दिग्दर्शित केलेला, हार्ट ऑफ स्टोन हा टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबलच्या मालिकेतील पहिला सिनेमा असेल.

या चित्रपटात गाल गॅडोट, जेमी डोर्नन आणि आलिया व्यतिरिक्त सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर, जिंग लुसी आणि पॉल रेडी यांच्या भूमिका आहेत.

१ मी २०२३ ला मेट गाला हा फॅशन फेस्टिव्हल न्यूयॉर्क शहरात होत आहे. "कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी." या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाचे उद्घाटन हा फेस्टिव्हल साजरा करतोय.

आलिया व्यतिरिक्त, प्रियंका चोप्रा, किम कार्दशियन, बिली इलिश, केंडल जेनर, रिहाना, गिगी हदीद, नाओमी कॅम्पबेल, ब्लॅकपिंकमधील रोज आणि जेनी आणि लिली-रोज डेप असे अनेक हॉलिवूड सितारे या फेस्टिव्हल मध्ये रेड कार्पेटवर दिसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com