Alia Bhatt: प्रसूतीसाठी आलिया भट्ट आज रुग्णालयात; या दिवशी मिळणार गोड बातमी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt delivery she will admit today in  H.N. Reliance Foundation Hospital mumbai for give birth to her first child

Alia Bhatt: प्रसूतीसाठी आलिया भट्ट आज रुग्णालयात; या दिवशी मिळणार गोड बातमी..

Alia Bhatt delivery: अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच आईबाबा होणार आहे. सध्या बोलीवूडमध्ये फक्त आलियाच्या प्रसूतीबाबत चर्चा आहे. लग्नानंतर काही महिन्यातच आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली चाहत्यांना मोठा आनंद झाला. तेव्हापासून आलिया कधी आई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण तो क्षण आता दूर नाही. आपल्या प्रसूतीसाठी आलिया आज मुंबईतील एच. एन. रुग्णालयात दाखल होणार असल्याचीन माहिती समोर आली आहे.

(Alia Bhatt delivery she will admit today in H.N. Reliance Foundation Hospital mumbai for give birth to her first child)

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, आज आलिया प्रसूतीसाठी गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आलिया आणि रणबीर इथे पोहोचतील असेही सांगण्यात आले आहे.

आलियाची प्रसूती नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार काही काळ आधीच आलिया रुग्णालयात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे आलियाचे सासरे ऋषि कपूर यांनीही याच रिलायन्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता, आता त्याच ठिकाणी आलियाची प्रसूती होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच आलियाचे डोहाळजेवण पार पडले. यावेळी आलियाच्या गोड फोटो पाहून सारेच आनंदित झाले. ती सध्या पूर्णतः आपल्या प्रेग्नंसीवर लक्ष देत आहे. आता ती लवकरच आई होणार असल्याने घरच्यांसोबत चाहतेही त्या दिवसाची वाट पाहत आहेत. प्रसुतीनंतर आलिया किमान एक वर्ष मॅटरनिटी लीव्ह घेणार आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.