Alka kubal birthday: सतत रडणाऱ्या अलका ताईंची लव्हस्टोरी ऐकाल तर थक्क व्हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alka kubal birthday alka kubal and Sameer Athalye love story

Alka kubal birthday: सतत रडणाऱ्या अलका ताईंची लव्हस्टोरी ऐकाल तर थक्क व्हाल

Alka kubal birthday: अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. 'माहेरची साडी' सारखे कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहे. मग ती 'आई माझी काळूबाई' मालिका असो किंवा 'धुरळा' सारखा दर्जेदार चित्रपट. अलका ताईंनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे. अलका कुबल म्हणजे रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तरी त्यांचा चाहताव वर्ग कमी झालेला नाही. आज अलका ताईंचा वाढदिवस. आपल्या मालिका, चित्रपट या माध्यमातून रडवणऱ्या, भावूक करणाऱ्या अलका ताई खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड रोमॅंटिक आहेत. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी.. (Alka kubal birthday alka kubal and Sameer Athalye love story)

अलका कुबळ यांचे लग्नानंतरचे नाव अलका समीर आठल्ये. अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये मनोरंजन विश्वात सिनेमॅटोग्राफर आहेत. आता तुम्ही म्हणाल यांचं प्रेम कसं जुळलं. तर त्यामागेही एक किस्सा आहे. अलका व समीर यांनी चार ते पाच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. त्यादरम्यान त्यांचा एक ग्रुप तयार झाला. या ग्रुपमध्ये दोघांचीही चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

प्रेमात पडल्यानंतर दोघं अनेकदा जुहू चौपाटीवर फिरायला जायचे. समीर आणि अलका यांचं एकत्र असणं अनेकांच्या नजरेत आलं होतं. एके दिवशी अलका यांच्या आईने त्यांना विचारलं, “तुम्ही दोघं एकत्र फिरता, लोक चर्चा करतात, नक्की तुमच्यात काय आहे?” हे ऐकून अलका जरा घाबरल्या. कारण तोपर्यंत दोघांपैकी कोणीच एकमेकांना प्रपोज केलं होतं. कोण कोणाला पहिला विचारणार आणि पुढून उत्तर काय येणार याची भीती दोघांमध्ये होती. अखेर आईने तगादा लावल्यावर अलका यांनी पुढाकार घेतला आणि समीर यांना लग्नासाठी विचारलं. अलका यांनी पुढाकार घेताच समीर यांनीही लगेच होकार दिला. पुढे हे प्रेम बहरत केले आणि कॅमेरासमोर असणाऱ्या अलका कुबल आणि कॅमेरामागे असणारे समीर खऱ्या अर्थानं एक झाले.

अलका यांच्या आईने सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. दोघंही एकाच क्षेत्रात कामाला असल्याने पुढे मतभेद झाल्यास नात्यावर परिणाम होणार अशी त्यांना भीती होती. पण समीर व अलका यांना त्यांच्या प्रेमावर खूप विश्वास होता. त्यांनी लग्नाचा निर्णय ठाम ठेवला. आज 25 वर्षाहून अधिक काळ त्यांचा सुखी संसार सुरू आहे.

Web Title: Alka Kubal Birthday Alka Kubal And Sameer Athalye Love Story Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..