Alka Yagnik: अलका याज्ञिक यांच्या समोर टेलर स्विफ्ट आणि BTS पण फिके.... केली मोठी कामगिरी

अलका यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत जे त्यांची गाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.
Alka Yagnik
Alka YagnikSakal

Alka Yagnik Guniess Book Of World Record: बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांनी त्यांच्या मधुर आवाजात अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत जी सुपर-डुपर हिट ठरली आहेत. अलका यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत जे त्यांची गाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे, गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.

टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या गायकांना मागे टाकत अलका यांनी हे यश संपादन केले आहे आणि यूट्यूबवर 2022 मधील सर्वाधिक ऐकलेल्या गायिका बनल्या आहेत.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार, अलका याज्ञिक यांच्या गाण्यांमध्ये 15.3 अब्ज स्ट्रीम रेकॉर्ड झाले आहेत, म्हणजे दररोज सरासरी 42 दशलक्ष स्ट्रीम. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी हे यशही मिळवले आहे.

2021 मध्ये त्यांचे 17 अब्ज स्ट्रीम्स आणि 2020 मध्ये 16.6 अब्ज स्ट्रीम्स होते. या यादीत असेही दिसून आले की अलका याज्ञिक यांचे अत्यंत प्रसिद्ध गाणे एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे हे 2021 आणि 2020 मध्ये यूट्यूबवर 16.6 वेळा स्ट्रीम केले गेले.

Alka Yagnik
Rani Mukherjee: अभिनयाची 'राणी' पुन्हा येतेय.. नवीन भूमिका आणि नवीन सिनेमाची घोषणा

या यादीत अलका नंतर बॅड बन्नी १४.७ अब्ज स्ट्रीम्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच यादीत तीन भारतीय गायक आहेत. त्यापैकी उदित नारायण (10.8 अब्ज), अरिजित सिंग (10.7 अब्ज) आणि कुमार सानू (9.09 अब्ज) यांचा समावेश आहे.

अलका याज्ञिक यांनी अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. अलका यांनी माधुरी दीक्षित, जुही चावला, श्रीदेवी आणि अनेक बड्या अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्या सर्वात हिट गाण्यांमध्ये परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला आणि अलीकडे आगर तुम साथ हो यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com