इथे प्रत्येकालाच 'हॉट' अभिनेत्री हवी असते- प्राची देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prachi Desai

इथे प्रत्येकालाच 'हॉट' अभिनेत्री हवी असते- प्राची देसाई

मालिकांमधून छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्री प्राची देसाईने Prachi Desai २००८ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'रॉक ऑन' Rock On, 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'बोल बच्चन' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. मात्र २०१६ पासून तू चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. यामागचं कारण आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. (All that people wanted actress to be was hot said Prachi Desai)

काय म्हणाली प्राची देसाई?

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत प्राची म्हणाली, "शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच मला मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. मालिकांनंतर मला चित्रपटांमध्येही काम मिळालं. फार कमी लोकांना करिअरमध्ये इतक्या पटापट संधी मिळतात. पण तेव्हासुद्धा मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ होते आणि आतासुद्धा आहे. अनेकजणांना प्रसिद्धी हवी असते, पण त्यासाठी तडजोड करणाऱ्यांपैकी मी नाही. मी चित्रपटांपासून दुरावले, यामागची अनेक कारणं आहेत. मला पुरुषांना श्रेष्ठ दाखवून स्त्रियांना कमी लेखणाऱ्या चित्रपटांमध्ये कधीच काम करायचं नव्हतं आणि इंडस्ट्रीत मी याच कारणासाठी फार संघर्ष केला. प्रत्येकाला फक्त 'हॉट' अभिनेत्रीच हवी असते. स्त्री केवळ त्याच दृष्टीकोनातून परिभाषिक कशी होईल? प्रत्येकाला एखादी स्त्री कशी आहे, कोण आहे हे जाणून न घेता तिची प्रतिमा का बदलायची असते? मला हॉट दिसण्यावर भर द्यावा लागेल असं अनेक निर्माते आणि दिग्दर्शक म्हणाले. त्यामुळे मी मोजकंच काम केलं आणि तशा गोष्टींपासून दूर राहणं पसंत केलं. यासाठी मी काही मोठ्या चित्रपटांनाही नकार दिला"

हेही वाचा: 'हे आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

याआधीही प्राचीने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. "मोठ्या चित्रपटाचा प्रोजेक्ट होता आणि त्यातील भूमिकेसाठी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. मी स्पष्ट नकार दिल्यानंतरही दिग्दर्शकाने मला पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला", असा खुलासा तिने केला होता.

प्राचीने २००६ मध्ये 'कसम से' या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि दोन वर्षांतच तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली. २००८ मध्ये तिने 'रॉक ऑन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

loading image
go to top