जेव्हा साऊथ स्टार अल्लू अर्जुन मराठीत म्हणतो,'सर्वांना माझा नमस्कार'South Superstar Allu arjun, Rashmika Mandana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu arjun

जेव्हा साऊथ स्टार अल्लू अर्जुन मराठीत म्हणतो,'सर्वांना माझा नमस्कार'

साऊथ सिनेमा म्हटलं की ज्या सुपरस्टार्सची नावं प्रामुख्यानं घेतली जातात त्यात,'अल्लू अर्जुन'(Allu arjun) हे नाव आजच्या घडीला अग्रगण्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचा 'रावडी लूक' हा मसालेदार तडक-भडक फायटिंग सिनेमात जितका शोभून दिसतो, तितकाच एखाद्या रोमॅंटिक सिनेमात त्यानं साकारलेला 'लव्हर बॉयही' अनेक मुलींना घायाळ करून जातो. त्याच्या अॅक्टिंग स्टाईलसोबतच त्याचा डान्सही त्याच्यावर नजर खिळवून ठेवण्यात बाजी मारून जातो. पण असं असलं तरी अद्याप हा साऊथ सुपरस्टार बॉलीवूडपासनं मात्र लांब राहिलाय. त्यानं एकही सिनेमा बॉलीवूडमधला केला नाही,जिथं अनेक साऊथ सुपरस्टार्सनी बॉलीवूडमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. पण आता त्यानं असं काही केलंय की बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत की, अल्लू अर्जुन आतातरी लवकरच बॉलीवूडचा सिनेमा नक्की करेल.

हेही वाचा: दुबईत असं काय घडलं की दीपिका-रणवीरच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या...

तर त्याचं झालं असं की,अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यानिमित्तानं अल्लू अर्जुन मुंबईत सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजर राहिला होता. त्याच्यासोबत सिनेमातील अभिनेत्री 'द एक्सप्रेशन क्वीन' म्हणून जिला ओळखलं जातं ती रश्मिका मंदानाही उपस्थित होती. या सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल ४५ कोटींचा गल्ला जमवून बॉक्सऑफिसवर दमदार ओपनिंग केलं आहे. सिनेमाविषयी क्रिटिक्सकडून मिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना ही दोन नावंच काफी आहेत प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्यासाठी. बरं ते सगळं जाऊ दे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अल्लू अर्जुननं अस्खलित हिंदीत बोलण्याचा प्रयत्न तर केलाच पण मराठीत आपल्या चाहत्यांना अभिवादन करून एक आश्चर्याचा धक्काही दिला. तो मराठीत म्हणाला,''सगळ्यांना माझा नमस्कार''. त्याचं हिंदी आणि मराठी ऐकायला हा सोबत जोडलेला व्हिडीओ इथे नक्की पहा.

याच कार्यक्रमात अल्लू अर्जुनला,'तुला बॉलीवूडचा सलमान खान म्हणतात, पण तुला तो आवडतो का?' असं विचारलं असता, याविषयावर मात्र त्यानं उत्तर देणं टाळलं. तर अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे आपले 'ऑल टाईम फेव्हरेट' अभिनेते आहेत हे त्यानं आवर्जुन नमूद केलं. 'पुष्पा' या त्याच्या सिनेमाचं दिग्दर्शन 'सुकुमार' यांनी केलं आहे. तर या सिनेमाचा दुसरा भागही लवकरच आपल्या भेटीला येतोय. २०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची बातमी आहे. पण आता इथे एक मुद्दा राहून राहून उठतोय ते अल्लू अर्जुनचं हिंदी-मराठी ऐकून. सुत्रांच्या माहितीनुसार कळतंय की अल्लू अर्जुन सध्या हिंदी चांगलं बोलण्याचे धडे घेतोय. आणि लवकरच इतर साऊथ स्टारप्रमाणे तो ही एक बिग बजेट बॉलीवूड सिनेमा लवकरच करेल.

Web Title: Allu Arjun Speaks In Marathi Ppm81entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..