प्रेक्षकांची नस ओळखलेली एकता कपूर लॉकडाऊनमध्येही स्वस्थ बसलेली नाही.. आता नवीन काय घेऊन येणार? याची उत्सुकता

ekta
ekta

मुंबई- एकता कपूर...छोट्या पडद्यावरची क्वीन. छोट्या पडद्यासाठी तिने कित्येक मालिका बनविल्या आणि त्या यशस्वी करून दाखविल्या. कोणत्या ना कोणत्या तरी वाहिनीवर तिची मालिका सुरू असतेच. के फॅक्टर तिला चांगलाच फळला आहे किंबहुना 'के' फॅक्टरने तिला घवघवीत यश दिले आहे. तिच्या अंधेरी येथील स्टुडिओबाहेर कित्येक स्ट्रगलर्स तरुण-तरुणींची रांग असते. कुणालाही आज 'बालाजी'मध्ये काम करावेसे वाटते आणि एकतादेखील नवोदितांना संधी देते. केवळ टीव्ही मालिकाच नाही तर चित्रपट आणि वेबविश्वातही तिने आघाडी घेतली आहे. काही चित्रपटांची निर्मिती तिने केली आहे तसेच 'अल्ट बालाजी' या नावाचा ओटीटी प्लॅटफाॅर्म काढून वेबसिरीजही तिने बनविल्या आहेत. मनोरंजन विश्वात चौफेर कामगिरी तिची सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी तिला यश मिळत आहे. त्याकरिता तिला तिचे वडील जितेंद्र आणि भाऊ तुषार यांचेही सहकार्य मिळत आहे. 

एकता कधीही गप्प बसत नाही तर तिची काही ना काही कामे नेहमीच सुरू असतात. 'एक विलन 2' आणि 'पगलेट' हे दोन चित्रपट तिचे या वर्षात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे चित्रीकरण बंद आहे. सगळे काम ठप्प झाले आहे. तरीही एकता घरच्या घरी आपल्या कामात व्यस्त आहे. सध्या एकता विविध स्क्रीप्टचे वाचन करते आहे. आता तिच्या हातात साधारण पंचवीसेक स्क्रीप्ट आहेत आणि एकता अत्यंत विचारपूर्वक वाचन करीत असून त्यावर चित्रपट काढावा की वेबसीरीज असाही तिचा विचार सुरू आहे. 

अजून तरी तिने तसे काहीही ठरविलेले नाही. मात्र वर्कहोलिक एकता प्रेक्षकांना काय चांगले देता येईल याचा विचार करीत आहे. लाॅकडाऊन संपले आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली की एकता आपले नीवन प्रोजेक्ट्स सेटवर घेऊन जाणार आहे. पुढील काही महिन्यांत आपल्या प्रेक्षकांना किती चांगला कंटेन्ट देता येईल यासाठी ती धडपड करत आहे.

amidst the lockdown ekta kapoor is working on new content while reading a new script  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com