अमिताभ यांनी सोडला होता 'झुंड' सिनेमा, नागराज नाही तर 'या' अभिनेत्यामुळे दिला होकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

गेल्या दिवसांपासून चर्चा आहे ती 'झूंड' या चित्रपटाची. विशेष म्हणजे यामध्ये बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी देखील दिसणार आहेत. पण, मध्यंतरी त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता. 

मुंबई : नागराज मंजुळे हे नाव आता फक्त मराठी सिनेमा इंडस्ट्रीपर्यंत मर्यादित राहिले नसून आता ते थेट हिंदीमध्येही जाऊन पोहोचले आहे. एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट तयार करुन त्यांनी आपलं नाव कमावलं शिवाय मातीतल्या नवीन कलाकारांना कलाकार बनण्याची संधी दिली. आता नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. गेल्या दिवसांपासून चर्चा आहे ती 'झूंड' या चित्रपटाची. विशेष म्हणजे यामध्ये बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी देखील दिसणार आहेत. पण, मध्यंतरी त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

हा चित्रपट काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कॉपीराइट्सच्या मुद्दयामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांवर आरोप करण्यात आले होते. या सर्व वादांवर मात करत मात्र चित्रपटाने शुटींग पूर्ण केले आहे. पण, अमिताभ यांनी हा चित्रपट करण्याचा निर्णय बदलत शुटिंगदरम्यान चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. या चित्रपटामध्ये बिग बी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रिडा शिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 

सैराटच्या आर्चीचा झाला साखरपुडा ?

बिग बी चित्रपट न करण्यामागे काय होतं कारण ?
चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान बिग बी यांनी चित्रपट करण्यास नकार दिला. सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या. शुटिंगच्या तारखांमध्ये आणि वेळांमध्ये सतत बदल होत होता. त्याचा परिणाम बिग बी यांच्या एकंदरित कामावर होत होता. त्यामुळे बिग बी यांनी चित्रपट पुढे न करण्याचा निरोप नागराज मंजुळे यांना दिला. घेतलेले मानधनही त्यांनी निर्मात्यांना परत केले.  त्यानंतर मात्र बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने बिग बी यांना परत आणले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

दुसरं तिसरं कोणी नाही तर आमिर खानने मध्यस्ती करुन त्यांना पुन्हा चित्रपट करण्याची विनंती केली. निर्मात्यांनी पुढील वेळापत्रक काटेकोरपणे पाळून 45 दिवसांतच शुटिंग संपवले. झोपडपट्टीतील मुलांसोबत बिग बी यांनी काम केले आहे. पण इतर वेळीही व्हॅनिटी व्हॅनमध्ये न बसता ते या मुलांसोबत वेळ घालवत असत. 

नागपूरचे निवृत्त क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत असणार आहे. चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पम, नागराज यांच्या इतर सिनेमांप्रमाणे हाही प्रेक्षकांना आवडेल याची आशा व्यकत करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bacchan left Nagraj manjules zhund movie