बिग बींनी 'चेहरे'चं मानधन नाकारलं; निर्मात्यांनी सांगितलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिग बींनी 'चेहरे'चं मानधन नाकारलं; निर्मात्यांनी सांगितलं कारण

बिग बींनी 'चेहरे'चं मानधन नाकारलं; निर्मात्यांनी सांगितलं कारण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अमिताभ यांनी तगडं मानधन घेतले आहे. परंतु आगामी 'चेहरे' (Chehre) या चित्रपटामध्ये काम करण्याासाठी बिग बी यांनी एकही रूपया घेतला नाही. बिग बी यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मानधन न घेण्याचे कारण या चित्रपटाच्या निर्माते आनंद पंडित (Anand Pandit) यांनी सांगितलं आहे.

पिपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आनंद पंडित यांना चेहरे चित्रपटासाठी अमिताभ यांच्या मानधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला आनंद यांनी उत्तर दिले, 'चेहरे चित्रपटासाठी अमिताभ यांनी एकही रूपया मानधन घेतले नाही. कारण त्यांना चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती.' पुढे आनंद पंडित म्हणाले, 'अमिताभ बच्चन हे अत्यंत प्रोफेशनल आहेत. ते कधीही त्यांच्या जवळच्या लोकांना चिंतेत पाहू शकत नाहीत. अमिताभ सरांनी सेट वर येण्या- जाण्याचा खर्च देखील स्वत: केला होता. परदेशात शूटिंगला जाण्यासाठी लागणाऱ्या चार्टर प्लेनचा खर्च देखील त्यांनी स्वत: केला.' आनंद यांनी हे देखील सांगितले की, टॅक्स बुक भरताना कोणतीही समस्या येऊ नये म्हणून अमिताभ यांच्या नावा पुढे 'फ्रेंडली अपियरन्स' असं लिहिण्याचे ठरवण्यात आले आहे.

हेही वाचा: दिग्दर्शक रुमी जाफरीकडून रिया चक्रवर्तीचं कौतुक

चेहरे हा चित्रपट 17 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले असून चिपटामध्ये अमिताभ यांच्यासोबत इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

loading image
go to top