'मला पैसे मागायला लाज वाटते'; फंड जमा करण्याबाबत बिग बींचं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

'मला पैसे मागायला लाज वाटते'; फंड जमा करण्याबाबत बिग बींचं वक्तव्य

कोरोना काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रूग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी देखील कोरोना रूग्णांसाठी मदत केली. त्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. अमिताभ यांनी कोरोना रूग्णांसाठी 25 कोटींची मदत केली. याबद्दल त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी इतरांकडून पैसे मागून फंड जमा करायला आवडत नसल्याचे सांगितले. (amitabh bachchan feel embarrassment for asking welfare funds for pandemic)

अमिताभ यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले, 'निधी उभारण्याचे काम खरोखर कौतुकास्पद आहे. पण मी हे कधीही स्वत:हून सुरू करणार नाही, कारण मला इतकांकडून पैसे मागण्यास लाज वाटते आणि मी एकट्याने २५ कोटी रुपये दान केले आहेत.' मी या ब्लॉगमध्ये डोनेशनचा विषय माझं कौतुक करण्यासाठी मांडत नाही. पण या माध्यमातून मला खात्री द्यायची आहे की मी केलेली मदत खरोखरच लोकांपर्यंत पोहोचत आहे. इथे 'पोकळ आश्वासनं' दिली जात नाहीत.' पब्लिक वेलफेअरसाठी केलेल्या जाहिरातींसाठी पैसे घेत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट करतो त्याच्यासाठी पैसे घेत नाही. '

हेही वाचा: पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीमधील रकब गंज गुरुद्वारामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी दोन कोटी रुपयांची मदत केली होती. त्यावेळी बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताची मदत करण्याची विनंती केली. 'माझा देश भारत हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. एक नागरिक म्हणून मी जगाला विनंती करतोय की त्यांनी भारताची मदत करावी', असं ते म्हणाले होते. अमिताभ यांच्याशिवाय अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशनसारखे सेलिब्रिटी फंड उभारणीतून करोना पीडितांच्या मदतीसाठी पैसे जमा करत आहेत.