esakal | पारंपारिक वेशभुषेतील बिग बींचा लूक, सेल्फीमध्ये दिसल्या जया आणि श्वेता
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh

बिग बींंच्या सेल्फीमध्ये पत्नी जया बच्चन आणि लाडकी लेक श्वेता देखील दिसून येत आहेत. बिग बींचा यामध्ये पारंपारिक लूक दिसत असून खास गोष्टी अशी की जया बच्चन आणि श्वेता देखील अशाच पारंपरिक वेशभुषेत दिसत आहेत.

पारंपारिक वेशभुषेतील बिग बींचा लूक, सेल्फीमध्ये दिसल्या जया आणि श्वेता

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- महानायक अमिताभ बच्चन  यांच्यासाठी मंगळवारचा दिवस खास होता. कारण यादिवशी त्यांनी काम देखील केलं आणि कुटुंबियांसोबत वेळ देखील घालवला. बिग बी अनेकदा त्यांच्या मनात येईल त्या गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असतात. असाच एक फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये बिग बींंच्या सेल्फीमध्ये पत्नी जया बच्चन आणि लाडकी लेक श्वेता देखील दिसून येत आहेत. बिग बींचा यामध्ये पारंपारिक लूक दिसत असून खास गोष्टी अशी की जया बच्चन आणि श्वेता देखील अशाच पारंपरिक वेशभुषेत दिसत आहेत.

हे ही वाचा: आमिरच्या फिटनेस कोचसोबतच रिलेशनशिपमध्ये आहे मुलगी इरा खान?    

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला फोटो शूटींग दरम्यानचा आहे. यामध्ये बिग बींसह श्वेता व जया बच्चन या पारंपरिक कपडे परिधान केले असून चेहऱ्याला मास्क लावला आहे. ‘संपूर्ण कुटुंब कामावर’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. याबद्दल बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्येही लिहिलं आहे. बिग बींना हा फोटो शेअर करत त्यामध्ये कुटुंबासोबत शुटिंगचा आणि एकुणच या कठिण काळात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय, ''जेव्हा कुटुंब एकत्र काम करतं तेव्हा एकजुटीची भावना तर असतेच सोबतंच सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी सल्ले आणि सूचना देखील असतात.''

अमिताभ सध्या 'कौन बनेगा करोडपती १२' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. तसंच सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाचं त्यांचं शूट देखील त्यांनी पूर्ण केलं आहे.   

amitabh bachchan jaya bachchan and shweta bachchan wedding dress for shoots  

loading image