Amitabh Bacchan: 'तुमचं आणि माझं सेम! मी ही सकाळी...' |KBC 14 Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bacchan

Amitabh Bacchan: 'तुमचं आणि माझं सेम! मी ही सकाळी...'

Amitabh Bachchan KBC 14: महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. वयाच्या 79 व्या वर्षी (viral video) देखील त्यांचा उत्साह हा अवाक करणारा आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या अमिताभ यांचे स्टारडम अद्याप (bollywood news) कायम आहे. त्यांच्याबरोबरीच्या सर्व कलाकारांनी केव्हाच निवृत्ती घेतली आहे. मात्र अमिताभ अजुनही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात (entertainment news) काम करताना दिसत आहे. केबीसीच्या 14 व्या पर्वात अमिताभ यांचा तोच उत्साह जो पहिल्या पर्वात अजुनही दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी व्हायरल झाला होती. अमिताभ यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्यानं काळजी व्यक्त करण्यात आली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अमिताभ हे पुन्हा एकदा कार्यरत झाले. त्यांच्या या उत्साहाचे नेहमीच चाहते कौतूक करताना दिसत आहे. यासगळ्यात अमिताभ यांनी केबीसीच्या एका शोमध्ये आपण अजुनही 14 तास काम करत असल्याचे सांगून सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर अमिताभ हे केबीसीच्या सेटवर होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.

अमिताभ यांच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बॉलीवूडमध्ये नव्यानं येणाऱ्यांसाठी अमिताभ मोठं प्रेरणास्थान असल्याचे दिसून आले आहे. कित्येक अभिनेते त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. आजारपणातून बाहेर आल्यानंतर मी 14 तास काम करतो आहे. असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

त्याचं झालं असं की, केबीसीमध्ये सहभागी झालेल्या ब्रिज किशोर नावाच्या एका स्पर्धकानं आपल्या कामाविषयी सांगितले. मला रोज बारा तास काम करावे लागते. आणि आम्हाला महिन्यातून फक्त दोनच सुट्टी मिळतात. तेव्हा अमिताभ किशोर यांना सांगतात की, तुमची आणि माझी परिस्थिती सारखीच आहे. मलाही रोज सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करावी लागते. दिवसभरातील 14 तास मला काम करावे लागते. त्यानंतर अमिताभ यांनी कोरोनाच्या दरम्यान असलेलं आयसोलेशन याविषयी प्रेक्षकांना आपले अनुभव सांगितले आहे.