अमिताभ बच्चन यांना नात आराध्याने सांगितला होता कोरोनाचा खरा अर्थ

amitabh
amitabh

मुंबई- देशभरात कोरोना व्हायरससा कहर सुरुच आहे. या महारोगराईची लागण आत्तापर्यंत कित्येकांनी झाली आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. नुकतंच अमिताभ यांनी सांगितलं की त्यांची नात आराध्याने त्यांना कोरोनाचा खरा अर्थ सांगितला आहे. 

अमिताभ बच्चन सतत लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सल्ला देत असतात. अमिताभ चाहत्यांना या संसर्गापासून सतर्क राहण्यासाठी देखील सांगत असतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जे अमिताभ बच्चन लोकांना कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क करत असतात त्यांना स्वतःला त्यांची नात आराध्याने या व्हायरसशी संबंधित एक खास गोष्ट सांगितली होती. एका शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी स्वतः याविषयी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांची नात आराध्याने त्यांचा कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमचा बदलला होता.

अमिताभ यांनी सांगितलं की 'आराध्याने मला सांगितलं होतं कोरोनाचा अर्थ नक्कीच ताज आहे. मात्र हा शब्दाविषयी नीट समजून घेतलं तर त्याचा अर्थ होतो 'करो ना'. अमिताभ पुढे म्हणाले, 'सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही असं काही केलं नाही पाहिजे ज्यामुळे या खतरनाक व्हायरसला पसरण्याची संधी मिळेल. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन न केल्याने, खोकताना तोंडावर रुमाल न धरण्यापर्यंत अशा सगळ्या कामांपासून बचाव केला पाहिजे ज्यामुळे आपण कोरोनाच्या या लढाईत आपलं योगदान देऊ शकु,'  आराध्या बच्चन देखील बच्चन कुटुंबियांसोबत कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली होती. मात्र या सगळ्यांनी कोरोनाचा सामना करत त्यापासून स्वतःला कोरोनामुक्त केलं.  

amitabh bachchan reveals that her grand daughter aradhya bachchan taught him about covid 19  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com