Amitabh Bachchan: जया, रेखा कि हेमा! बिग बींची आवडती अभिनेत्री कोण? स्वत: केला खुलासा

Amitabh Bachchan
Kaun Banega Crorepati 15
Kaun Banega Crorepati 15: Amitabh Bachchan reveals who his favourite actress in Bollywood is
Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 15 Kaun Banega Crorepati 15: Amitabh Bachchan reveals who his favourite actress in Bollywood isEsakal
Updated on

KBC Season 15 : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय क्विझ शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. हा शो सर्वच लोक मोठ्या आवडीने पाहतात. गेल्या 23 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

या शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर पडते. आता कौन बनेगा करोडपती या शोचा 15 वा सीझन सुरू झाला आहे. हा शो जेव्हाही छोट्या पडद्यावर येतो तेव्हा त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

मनोरंजन विश्वात शंहशाह म्हणुन ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हा शो होस्ट करतात. हा शो होस्ट करतांना ते अनेक गमतीजमती करत असतात. त्याच्याबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल काही किस्सेदेखील ते सांगतात. अशातच एका एपिसोडमध्ये त्यांनी त्यांची आवडती अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा केला आहे.

Amitabh Bachchan
Kaun Banega Crorepati 15
Kaun Banega Crorepati 15: Amitabh Bachchan reveals who his favourite actress in Bollywood is
AP Dhillon Trolled For Tiranga Shoes: तिरंग्याच्या रंगाचे बूट घातल्यानं पंजाबी सिंगर ट्रोल नेटकऱ्यांनी म्हटलं 'खलिस्तानी'!

त्याच झालं असं की, शो सुरु असतांना हॉट सीटवर बसलेले स्पर्धक राहुल कुमार नेमा यांनी मनोरंजन विश्वाशी निगडित एक प्रश्न विचारला. यापैकी कोणत्या शहराचे नाव अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या 2007 मध्ये आलेल्या चित्रपटाच्या नावावर आहे? यात त्याला बिग बींनी चार ऑप्शन दिले. A. लंडन, B. टोकियो, C. न्यूयॉर्क, D. पॅरिस.

Amitabh Bachchan
Kaun Banega Crorepati 15
Kaun Banega Crorepati 15: Amitabh Bachchan reveals who his favourite actress in Bollywood is
Gadar 2 Box Office Collection: रिलिजच्या सातव्या दिवशी गदर2 चं वादळ शमलं! आत्तापर्यंत केली इतक्या कोटींची कमाई..

याप्रश्नाचं बरोबर उत्तर राहुलनं दिलं आणि 10,000 रुपयांची कमाई केली. यावेळी राहूल म्हणाला की, कतरिना ही त्याच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी आहे . त्यानंतर त्याने अमिताभ बच्चन यांना त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल प्रश्न केला. यावर तो पर्याय देणार त्यापुर्वी बिग बींनी त्याला उत्तर दिलं.

Amitabh Bachchan
Kaun Banega Crorepati 15
Kaun Banega Crorepati 15: Amitabh Bachchan reveals who his favourite actress in Bollywood is
Rajinikanth Jailer Movie : जेलरचा धिंगाणा! तर रजनीकांत झारखंडमधील राजरप्पा मंदिरात भक्तीत तल्लीन

यावर उत्तर देतांना त्यांनी सांगितलं की, आता ते मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ज्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे त्या सर्वच त्यांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. आता जर त्यांनी एकीच नाव घेतलं तर बाकिच्या अभिनेत्रीं नाराज होतील.

पुढं ते म्हणतात की , 'आता माझं वय झाल्यामुळे मला अनेक यंग अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळत नाही. पण जो थोडा फार मानसन्मान मला मिळतो तो देखील मिळणार नाही. सर्वच अभिनेत्री खूप टॅलेंटेड आहेत.' अशाप्रकारे उत्तर देत बिग बींनी सर्वांचीच मनं जिंकून घेतली.

Amitabh Bachchan
Kaun Banega Crorepati 15
Kaun Banega Crorepati 15: Amitabh Bachchan reveals who his favourite actress in Bollywood is
Nushrratt Bharuccha 'मी एक माणूसच मला वाईट वाटतं', ड्रिम गर्ल2 मध्ये अनन्या का? नुसरतचं वक्तव्य चर्चेत

नंतर जेव्हा राहूलने त्यांना सांगितले की एकदा त्यांनी क्रिती सेननसोबत त्यांना डान्य करतांना पाहिले होते त्यांमुळे ती बिग बींची आवडती अभिनेत्री आहे असं त्याला वाटलं होतं मात्र यावर बिग बी म्हणाले, "ते एका कार्यक्रमात झालं होतं. मी ज्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे त्यांच्यासोबत मी डान्स केला आहे."(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com