Amitabh Bachchan: बंगल्याबाहेर चाहत्यांची तूफान गर्दी.. हात जोडत अमिताभ म्हणाले..

अलोट गर्दीचे फोटो शेयर करत अमिताभ यांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष..
Amitabh Bachchan said thanks to fans with folded hands and bended knees for visiting him every Sunday since 1982 nsa95
Amitabh Bachchan said thanks to fans with folded hands and bended knees for visiting him every Sunday since 1982 nsa95sakal

Amitabh Bachchan: बॉलीवुड सेलेब्रिटींना भेटण्यासाठी चाहते अक्षरशः जीवाचं रान करत असतात, मग कधी त्यांच्या घराबाहेर जाऊन उभे राहतात तर कधी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना काढून त्यांची दुरूनच भेट घेऊन समाधान मिळवतात. कलाकारांनाही आपल्या चाहत्यांचे प्रेम महत्वाचे असल्याने तेही अगदी वेळात वेळ काढून जमेल तसं चाहत्यांना भेटतात. पण बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन गेली 40 वर्षे दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटतात, त्याचाच हा किस्सा आज त्यांनी पोस्ट करून सांगितला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्या बाहेर दर रविवारी मोठ्या संख्येनं चाहत्यांची गर्दी जमा होते. अमिताभ देखील चाहत्यांना निराश करत नाहीत. ते आवर्जून या भेटीसाठी उपस्थित राहतात आणि जमलेल्या गर्दीपुढे नतमस्तक होतात. 1982 पासून हा भेटीचा कार्यक्रम आजपर्यंत सुरूच आहे. कधी गर्दी कमी असते तर तूफान जमाव होतो. काल 19 फेब्रुवारी रोजी चाहत्यांची तोबा गर्दी झाली. त्याचेच काही फोटो अमिताभ यांनी शेयर केले आहेत.

(Amitabh Bachchan said thanks to fans with folded hands and bended knees for visiting him every Sunday since 1982)

Amitabh Bachchan said thanks to fans with folded hands and bended knees for visiting him every Sunday since 1982 nsa95
Yetoy To khatoy: भार्गवी घेऊन आलीय अस्सल लावणीचा गावरान ठसका.. पाहून पब्लिक पागल..

रविवारी 19 फेब्रुवारी रोजी चाहत्यांची तोबा गर्दी अमिताभ बच्चनच्या बंगल्याबाहेर जमा झाली होती,तेव्हा बिग बी यांनी देखील त्यांची मोठ्या प्रेमानं भेट घेतली. चाहत्यांना अभिवादन करताना अमिताभ यांनी आधी आपला हात उंचावला आणि मग आपले दोन्ही हात जोडत सर्वांना नमस्कार केला. यावेळी चाहत्यांवरील प्रेमासोबतच त्यांच्याप्रती असलेला आदरही अमिताभ यांच्या कृतीतून दिसला.

सोबत फोटो शेयर केलेले पोस्ट मध्ये अमिताभ म्हंटले आहेत, 'हे प्रेम.. जे 1982 पासून प्रत्येक रविवारी मला भरभरून अनुभवता येतं. या प्रेमपुढे मी हात जोडून आणि गुडघे टेकून नतमस्तक आहे. ये प्यार , हर इतवार .. आभार आभार आभार .. परम आभार' असे त्यांनी लिहिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्याचे कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com