Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांचं प्रशांत दामलेंसाठी खास मराठीत ट्विट, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan tweet in marathi to congatulate prashant damle for his 12500 theater performance

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांचं प्रशांत दामलेंसाठी खास मराठीत ट्विट, म्हणाले...

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचे यांच्या १२,५०० व्या नाट्य प्रयोगाचं आयोजन नुकतेच मुंबईत करण्यात आले होते. दामले यांच्या या प्रदिर्घ कारकिर्दीचं चित्रपट विश्वातून कौतुक केलं जात आहे. यादरम्यान बॉलिवुडमध्ये महानायक अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील खास मराठीत ट्विट करत प्रशांत दामले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दामले यांच्या या विक्रमी नाट्य प्रयोगाच्या कार्यक्रमाला आज हजेरी लावली होती.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे की, "प्रशांत दामले यांचा १२,५०० प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. ३९ वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी 'एका लग्नाची गोष्ट' या १००० व्या प्रयोगाला गेलो होतो..आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!" असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: …ही परंपरा तर पुरंदरेंनीच सुरू केली; संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर आव्हाडांचं ट्विट

प्रशांत दामलेंनी मानले आभार

अमिताभ बच्चन यांच्याकडून देण्यात आलेल्या शुभेच्छानंतर अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत अमिताभ यांचे आभार माणले आहेत. "धन्यवाद सर, अमिताभ बच्चन , अभिनेत्यांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार्‍या व्यक्तीकडून असे कौतुकाचे शब्द येणे खरोखरच भावनिक अनुभव आहे. मनःपूर्वक कृतज्ञता!" अशा शब्दात त्यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार माणले आहेत.

टॅग्स :Amitabh Bachchan