
'विखारी आकसापोटी गरळ ओकण्याआधी..' अमोल कोल्हे यांचा केतकी चितळेला सल्ला
टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली. (Ketaki Chitale made offensive post about Sharad Pawar) या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आता केतकीवर टीकेची झोड उठली आहे. खासदार डाॅ. अमोल कोल्हे (Dr. amol kolhe) यांनीही तिला एक सल्ला दिला आहे.
केतकीने शरद पवार यांच्यावर मर्यादा ओलांडून टीका केली होती. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. यात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. केतकीचे ही पोस्ट व्हायरल झाल्याने तिला ती चांगलीच भोवली आहे. केतकीवर कळवा आणि पुण्यात गुन्हा दाखल आला असून आता सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही तिच्या पोस्टचा निषेध केला असून तिला मोलाचा सल्ला दिला आहे. ''साहेबांबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध! महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवार साहेबांचं मोलाचं योगदान आहे. विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा.' असे कोल्हे यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे सर्व नेते आता या प्रकरणात विशेष लक्ष घालत असून केतकीच्या अटकेची मागणी होत आहे. (amol kolhe comment on ketaki chitale)
Web Title: Amol Kolhe Comment On Ketaki Chitale And Give Her Advice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..