esakal | ऐकलं का? अमृताताईंचं गाणं येतेय; चाहत्यांची उत्सुकता शिगेला 

बोलून बातमी शोधा

Amruta fadnavis new song released world womens day occasion }

जेव्हा अमृता यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली त्यावेळी त्यांना काही जणांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे.

ऐकलं का? अमृताताईंचं गाणं येतेय; चाहत्यांची उत्सुकता शिगेला 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे वेध चाहत्यांना लागले असतात. चाहते चातकासारखी त्यांच्या गाण्याची वाट पाहत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणा-या अमृताजींचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. येणा-या महिला दिनी त्यांचे गाणे प्रदर्शित होणार आहे. त्यांनीच ही माहिती व्टिट करुन दिली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ताईंचे गाणे ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अमृता यांनी व्टिटव्दारे दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी, तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोखणे शक्य नाही ! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी. ही पोस्ट केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटस् चाहत्यांनी दिल्या आहेत. अनेकदा ताईंना त्यांच्या गाण्यामुळे ट्रोलही व्हावे लागले आहे. मात्र टीका करणा-यांची पर्वा न करता त्यांनी आपले गायन सुरु ठेवले आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही त्या गायल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या गाण्याला चाहत्यांची पसंती मिळाली होती.

केवळ सांस्कृतिक नव्हे तर वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींमध्येही अमृताजींचा सक्रिय सहभाग दिसून आला आहे. समाजात होत असलेल्या चूकीच्या गोष्टींवर परखड मत व्यक्त करणे ही त्यांची ओळख आहे. ठाम भूमिका घेण्यासाठीही त्या प्रसिध्द आहेत. जेव्हा अमृता यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली त्यावेळी त्यांना काही जणांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. अमृता यांच्या या अगोदरच्या गाण्याच्या व्हिडिओजच्यावेळी देखील त्यांना अशाच प्रकारे ट्रोल केले गेले होते.

अमृता यांनी आपल्या नवीन गाण्याची पोस्ट शेअर करताना जो फोटो पोस्ट केला आहे त्याचेही चाहत्यांनी स्वागत केले आहे. अनेकांना तो फोटो आवडला आहे. एक वेगळ्या प्रकारचा लूक अमृता यांचा यावेळी पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.