पुन्हा घुमणार घुंगरांचा आवाज.. पुन्हा खुलणार तिच्या सौंदर्यची जादू.. Chandramukhi 2 येतोय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad oak, chandramukhi, chandramukhi 2, amruta khanvilkar

पुन्हा घुमणार घुंगरांचा आवाज.. पुन्हा खुलणार तिच्या सौंदर्यची जादू.. Chandramukhi 2 येतोय?

Chandramukhi Marathi Movie News: अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. अमृता खानविलकरच्या लावणीचं, तिच्या अदांचं प्रचंड कौतुक झालं.

आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर यांची लव्हेबल केमिस्ट्री सर्वांना आवडली. आता चंद्रमुखी २ येणार अशी दाट शक्यता आहे. अचानक अशी चर्चा का सुरु झालीय? त्यामागे एक महत्वाचं कारण आहे.

(amruta khanvilkar in and as chandramukhi 2 will be goes on floor soon)

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोत प्रसाद ओक, अमृता खानविलकर, मंजिरी ओक आणि चंद्रमुखी सिनेमात ज्याने लावणी कोरिओग्राफ केल्या असा नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील दिसतोय.

या फोटोवर अनपेक्षित भेट असं कॅप्शन लिहिलं असलं आहे. हि भेट जरी अनपेक्षित असली तरीही चंद्रमुखीची मुख्य टीम उपस्थित असल्याने चंद्रमुखी २ भेटीला येणार का? याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' चित्रपटाने मराठी मनोरंजन विश्वात वेगळीच जादू केली. गावकुसापासून ते परदेशापर्यंत हा चित्रपट पोहोचला. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी अथक परिश्रम केले.

या चित्रपटातील लावण्या तर अजूनही घराघरात वाजत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवरही चांगलीच कमाई केली.

लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर हा चंद्रमुखी सिनेमा आधारित होता. राजकारणी दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी सिनेमात दाखवण्यात आली. या सिनेमातलं चंद्रा हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

अगदी रस्त्यापासून ते मेट्रोपर्यंत सगळीकडे हे गाणं वाजलं. अजय-अतुलने सिनेमाला दिलेलं संगीत तुफान व्हायरल झालं.

चंद्रमुखी जिथे संपला तिथेच चंद्रमुखी २ सिनेमा सुरु होण्याची शक्यता आहे. चंद्रमुखी २ च्या कथानकाची पुरेपूर वाव आहे.

त्यामुळे प्रसाद ओक चंद्रमुखी २ च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून अमृता चंद्रा बनून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. आता याचा उलगडा लवकरच होईल अशी आशा.