अमृता खानविलकर ते उषा नाडकर्णी, हिंदी मालिकांमध्ये छाप सोडणारे मराठी कलाकार

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 26 November 2020

काही मराठमोळे कलाकार आहेत जे अनेकदा हिंदी मालिकांमध्ये दिसतात. एवढंच काय तर त्यांच्या भूमिकेने ते प्रेक्षकांच्या मनावर छाप देखील पाडण्यात यशस्वी होतात.अशाच काही कलाकारांविषयी...

मुंबई- अनेकदा मराठी कलाकार बॉलीवूड आणि इतर भाषिक सिनेमा, मालिकांमध्ये काम करताना पाहायला मिळतात. इतकंच काय आता तर हिंदी वेबसिरीजमध्येही मराठमोळे चेहरे हमखास पाहायला मिळतात. मात्र आता जसे सर्रास मराठी कलाकार हिंदीमध्ये काम करताना दिसतात तसे याआधी मात्र क्वचितंच दिसायचे. असेच काही मराठमोळे कलाकार आहेत जे अनेकदा हिंदी मालिकांमध्ये दिसतात. एवढंच काय तर त्यांच्या भूमिकेने ते प्रेक्षकांच्या मनावर छाप देखील पाडण्यात यशस्वी होतात.अशाच काही कलाकारांविषयी...

हे ही वाचा: कोरोना काळातही बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी केली जबरदस्त कमाई  

वर्षा उसगांवकर- १९९० मधील 'महाभारत' या मालिकेत वर्षा उसगावकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी काही वर्षे ब्रेक घेतल्यानंतर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून पुनरागमन केलं.

नीना कुळकर्णी- 'ये है मोहब्ब्तें', 'एक पॅकेट उम्मीद' आणि 'मेरी माँ' या हिंदी मालिकांमध्ये नीना कुळकर्णी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 

उषा नाडकर्णी- 'पवित्र रिश्ता' या मालिकेत 'मानव'च्या (दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत) आईची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.  

अमृता खानविलकर- मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे. अमृताने नुकताच 'खतरों के खिलाडी' या रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

अक्षया नाईक- 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अक्षया नाईक हिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय हिंदी मालिकेत भूमिका साकारली होती. अक्षयाने या मालिकेत अनन्याची भूमिका साकारली होती.

किशोरी शहाणे- 'बिग बॉस मराठी' फेम किशोरी शहाणे सध्या 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेत भूमिका साकारत आहेत.

किशोर महाबळे- 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेत अंकिता लोखंडेच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली होती. आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत ते काम करत आहेत.

उदय टिकेकर- 'कसौटी जिंदगी की' या प्रसिद्ध मालिकेत अनुरागच्या वडिलांची भूमिका उदय टिकेकर यांनी साकारली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता उदय टिकेकर हे 'जिगरबाज' या मराठी मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहेत.

from amruta khanvilkar to usha nadkarni marathi actors who are shining in hindi television  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from amruta khanvilkar to usha nadkarni marathi actors who are shining in hindi television