'चंद्रमुखी' झळकली स्पाईसजेटच्या विमानावर, अमृताला मिळाला 'हा' मान..

चंद्रमुखी या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर थेट विमानतळावर पोहोचली आहे . यावेळी स्पायजेटच्या विमानावर तिचा फोटो झळकला होता.
amruta khanvilkar on airport
amruta khanvilkar on airportsakal

Chandramukhi : प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाणीही गाजत आहेत. 'चंद्रा' आणि 'बाई गं' या गाण्याला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या गाण्यांसोबतच चर्चा आहे ती अभिनेत्री अमृता खानविलकरची. या चित्रपटातील चंद्रा म्हणजेच प्रमुख नायिका अमृता खानविलकर आहे. तिच्या नाजूक अदाकारी आणि नृत्याने चाहते घायाळ झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

amruta khanvilkar on airport
संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आता चित्रपट रूपात...

आज हा चित्रपट प्रदर्शित होणार असून शेवटच्या क्षणापर्यंत या टीमने जोरदार प्रमोशन केले. गुरुवारी सायंकाळी चक्क विमानतळावर जाऊन चंद्रमुखी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि अभिनेता आदिनाथ कोठारे (adinath kothare) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून चंद्रा आणि दौलत ही जोडी बरीच चर्चेत आहे. आता तर या दोघांनी मिळून असे प्रमोशन केले आहे की पाहून सगळ्यांचे डोळे दिपले आहेत. मराठी सिने विश्वात आजवर कधीही झाले नाही असे प्रमोशन चंद्रमुखीच्या टीमने केले आहे. हे प्रमोशन पाहून अमृतालाही धक्का बसला. ती अक्षरशः आनंदाने हुरळून गेली. गुरुवारी 'चंद्रमुखी' चित्रपटाचं पोस्टर चक्क स्पाइसजेट च्या विमानावर झळकवण्यात आलं.

amruta khanvilkar on airport
'भारतात फक्त एकच भाषा' : अजय- सुदीप वादावर सोनू सूद

या प्रमोशनसाठी अमृता आणि आदिनाथ यांनी सकाळीच एअरपोर्टवर हजेरी लावली होती. यावेळी अमृताने लाल रंगाची नववारी साडी नेसली होती. हे दोघेही विमानतळावर असल्याची माहिती अमृताने स्वतः एक गमतीशीर व्हिडीओ करून दिली होती. पुढे काही वेळातच 'चंद्रमुखी;ची संपूर्ण टीम धावपट्टीवर दाखल झाली. यावेळी स्पाईसजेटच्या विमानावर 'चंद्रमुखी'चे पोस्टर झळकवण्यात आले. हे पोस्टर पाहून अमृताही भारावून गेली.

विमानवरील या पोस्टरची सध्या भारीच हवा झाली आहे. यावेळी भारवलेल्या अमृताने विमानाजवळ जाऊन 'चंद्रा' ची साइन पोज दिली. तसेच चित्रपटातील 'चंद्रा' या गाण्यावर अमृता थिरकली. विमानतळावरील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अशा पद्धतीने प्रमोशन करणारा हा पहिला चित्रपट आहे तर विमानावर झळकणारी अमृता ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com