Amruta Subhash: 'वंडर वूमन' बनलेल्या अमृता सुभाषनं वेधून घेतलं लक्ष...पाहिलात का ट्रेलर?

आई-बाबा होणाऱ्या प्रत्येक दाम्पत्याने पहायला हवा 'वंडर वूमन' सिनेमाचा रिलीज झालेला ट्रेलर.
Amruta Subhash, Wonder Women trailer
Amruta Subhash, Wonder Women trailerInstagram

Amruta Subhash: रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ साराद्वारा निर्मित, वंडर वुमन या चित्रपटात नादिया मोईडू, नित्या मेनन, पार्वती थिरुवोथू, पद्मप्रिया जानकीरामन, सायोनारा फिलिप, अर्चना पद्मिनी आणि अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्मात्यांनी एका अनोख्या मोहिमेसह चित्रपटाची घोषणा केली जिथे कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी किटचे फोटो पोस्ट केले. अमृता सुभाषनं जेव्हा अशा पद्धतीनं प्रमोशन केलं तेव्हा तर तिच्या मराठी चाहत्यांमध्ये भलताच उत्साह पहायला मिळाला होता,अभिनेत्रीची गूडन्यूज ऐकल्यावर. पण हे सिनेमाचं प्रमोशन आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र चाहते नाराज झाले होते. पण आता पुन्हा सारे उत्सुक होतील वंडर वुमन या अमृताच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून हे देखील तितकंच खरं आहे. (Amruta Subhash, Wonder Women trailer)

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

Amruta Subhash, Wonder Women trailer
Sai Tamhankar: 'त्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक?', क्रांती रेडकरनं उघडं केलं सईचं पितळ

'वंडर वुमन'चा ट्रेलर आपल्याला सुमाना नावाच्या गरोदर महिलांच्या प्रसवपूर्व वर्गात घेऊन जातो जेथे मातृत्वाच्या शेवटच्या टप्प्यातून जात असताना त्यांचे स्वागत केले जाते. नोराच्या भूमिकेत नित्या मेनन, मिनीच्या भूमिकेत पार्वती थिरुवोथू, वेन्नीच्या भूमिकेत पद्मप्रिया जानकीरामन, सायाच्या भूमिकेत सायोनारा फिलिप, ग्रेसीच्या भूमिकेत अर्चना पद्मिनी आणि जयाच्या भूमिकेत अमृता सुभाष असलेला हा ट्रेलर एक्सपेक्टिंग पेरेंट्ससाठी सुरक्षित आश्रयस्थानाची एक झलक देतो.

या कथेमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या महिलांमधील नाते आणि जीवनाला सामोरे जाण्याची त्यांची मजेशीर आणि उत्साही पद्धत पाहायला मिळेल. ही महिला पात्रे देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतील यात शंका नाही. गर्भधारणा आणि त्यांची नवीन मैत्री एकमकेकांना कशी प्रेरणा देते अशी ही कथा त्यांच्या आयुष्यातील एक झलक आहे. एक म्हण आहे, "एक बच्चे को पालने के लिए एक गांव की जरूरत होती है" नवजात मुलाला या जगात आणण्यासाठी पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे उदाहरण देणारा हा एक उत्तम चित्रपट आहे.

आरएसव्हिपी (RSVP) आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन, रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ साराद्वारे निर्मित, अंजली मेननद्वारे लिखित व दिग्दर्शित असा हा चित्रपट १८ नोव्हेंबरपासून सोनी लिव्ह (SONY LIV) वर विशेष प्रवाहित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com