Bigg Boss Marathi 4: ते थुकतील तुझ्या तोंडावर.. अमृताने सोडली पातळी.. प्रसादचा राग अनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amurta dhongade and prasad jawade fight Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: ते थुकतील तुझ्या तोंडावर.. अमृताने सोडली पातळी.. प्रसादचा राग अनावर

bigg boss marathi : बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता साठ दिवसांचा टप्पा पार झाला आहे. तर या पर्वाला पहिले टॉप 10 स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे घरामध्ये एकमेकांच्या विरोधात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक टास्क मध्ये आपल्याला चढाओढ दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपणच कसे सरस आहोत ही दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. परिणामी त्यावरून राडा घालायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. असाच एक राडा बिग बॉस मराठीच्या घरात झाला आहे. यावेळी अमृता धोंगडेने अक्षरशः पातळी सोडली.

(amurta dhongade and prasad jawade fight Bigg Boss Marathi 4)

हेही वाचा: Subodh Bhave: वेडी माणसं! सुबोध भावेला फॅन्सनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट पाहून तुम्हीही..

अमृता आणि प्रसाद दोघेही टॉप दहा मधील स्पर्धक आहेत. अमृता प्रचंड राडा, वाद आणि आक्रसताळे पणा करून खेळते, तर प्रसाद हा अत्यंत शांट पद्धतीने खेळतो. नुकताच बिग बॉसने या स्पर्धकांना एक टास्क दिला, ज्यामध्ये एक टीम शिक्षकांची आणि एक टीम विद्यार्थ्यांची आहे. बिग बॉसच्या या शाळेत शिक्षकांनी नावडत्या विद्यार्थ्यांना नापास करायचे आहे. या टास्क दरम्यान प्रसाद शिक्षक असल्याने तो विद्यार्थिनी झालेल्या अमृता धोंगडेला नापास करतो. यावरून अमृता अक्षरशः घर डोक्यावर घेते.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

अमृता म्हणते, ''इथे समजतय कुणाची बुद्धी किती आहे ते.. मला नापास केलं तर बाकीचे शिक्षक पण थुकतील तुझ्या तोंडावर.. आधी वाचत जा आणि मग बोलायच.. स्वतःला काही माहीत नाही आणि आलाय मला सांगायला.. बधिर..'' अशी ती बोलते. ही करताना ती प्रसादच्या अंगावर धावून जाते. पण प्रसाद मात्र अत्यंत शांततेने तिच्याशी बोलतो. हा वाद आता किती टोकाला गेलाय, प्रसादने पण तिला तोडीस तोड उत्तर दिले का ही आजच्या भागात कळेल.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi