esakal | कचरा गोळा करणा-या भावांचं गाणं ऐकलं, आनंद महिंद्रा पडले प्रेमात
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra inspired from two garbage collectors brothers says will support in music training

दोन भावांनी हा गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. महिंद्रा यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, अतुल्य भारत. माझा मित्र रोहित खट्टरनं ही पोस्ट शेअर केली आहे.

कचरा गोळा करणा-या भावांचं गाणं ऐकलं, आनंद महिंद्रा पडले प्रेमात

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कला ही काही कुणाची मक्तेदारी नाही. ज्याच्या अंगी कला त्याला कशाची भीती नाही की कुणाच्या शिफारशीची गरजही नाही. असे आपल्याकडे म्हटले जाते. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे सध्या समाजातील उपेक्षित घटकांतील कलाही आता बहरास येताना दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जाणकारांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तो जेव्हा देशातील प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला तेव्हा ते थक्कच झाले.

महिंद्रा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे व्यक्तिमत्व आहे. आपल्याला आवडलेली पोस्ट शेअर करून त्यावर प्रतिक्रिया द्यायला त्यांना आवडते. एखादे गाणे, डान्स आवडला तर त्याला ते दिलखुलासपणे दादही देतात. अशीच एक दाद त्यांनी कचरा गोळा करणा-या दोन भावांच्या गाण्याला दिली आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या कचरा गोळा करणा-या त्या भावांचे गाणे ऐकून महिंद्रा यांना कमालीचा आनंद झाला. त्यांनी त्या मुलाच्या संगीत शिक्षणाचा खर्च उचलला आहे. त्यांनी लिहिले आहे की, तुझ्या संगीत शिक्षणाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.

दोन भावांनी हा गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. महिंद्रा यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, अतुल्य भारत. माझा मित्र रोहित खट्टरनं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांना ती सोशल मीडियावर मिळाली होती. दोन भाऊ आहेत. त्यांचे नाव हफिज आणि हबीबूर. ते दिल्लीतील एका कॉलोनीमध्ये कचरा गोळा करतात. मात्र त्यांची गाण्याची जी कला आहे त्याला तोड नाही. प्रतिभा कधी व कुठे कशी जन्म घेईल हे काही सांगता येत नाही. असंही महिंद्रा यांनी सांगितले आहे.

यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओजला बॉलीवूड सेलिब्रेटिंची पसंती मिळाली होती. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील एका गावात राहणा-या मुलीने माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स केला होता. सोशल मीडियावर हा डान्स एवढा व्हायरल झाला की त्याची दखल चक्क माधुरीनं घेतली. आणि आपल्या व्टिटरवरुनही तो व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे त्या मुलीच्या कलेला देशपातळीवर दाद मिळाली होती.