esakal | 'मला कुटूंबाची काळजी', अँजेलिनाचा ब्रॅडबाबत धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

'मला कुटूंबाची काळजी', अँजेलिनाचा ब्रॅडबाबत धक्कादायक खुलासा

'मला कुटूंबाची काळजी', अँजेलिनाचा ब्रॅडबाबत धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपं म्हणून अँजेलिना जोली आणि ब्रॅडच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. काही दिवसांपासून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु आहे. त्यावरुन सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे. हॉलीवूडमधील प्रसिद्ध कलावंत, पती - पत्नी यांच्यातील वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर यायला सुरुवात झाली आहे. त्यांच्यातील बेबनाव हा तर जगजाहीर होता. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. अँजेलिनानं ब्रॅडबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अँजेलिनानं केलेल्या आरोपांबाबत काही तथ्य आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिटचा घटस्फोट झाला आहे. मात्र त्यावर आता वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी करण्यास अँजेलिनानं केली आहे. अँजेलिनानं असा दावा केला आहे की, आपण जेव्हा ब्रॅडसोबत राहत होतो तेव्हा आपल्या परिवाराला मोठा धोका होता. त्यामुळे मला माझ्य़ा परिवाराची काळजी होती. ज्यावेळी आम्ही एका नात्यात होतो तेव्हा असुरक्षितता ही जाणवणारी महत्वाची गोष्ट होती. आता त्याच्यापासून विभक्त झाल्यानंतर हायसं वाटत असल्याची प्रतिक्रिया अँजेलिनानं दिली आहे. यापुढे माझा आणि कुटूंबियांचा प्रवास सुखकर आणि शांतीपूर्ण होणार असल्याचेही तिनं सांगितलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीनं आपल्या मुलांसोबत गैरकृत्य केलं होतं. त्यांच्यावर शाररिक अत्याचारही केले होते. त्यात तिनं आपल्या मोठ्या मुलासोबत मॅडॉक्स विमानात घडलेल्या प्रसंगाचाही उल्लेख केला आहे. त्या मुलाखतीमध्ये अँजेलिनानं असेही सांगितले होते की, माझ्या मुलांच्या संगोपनाबाबत मला मोठी काळजी भेडसावत असल्यानं मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला. कारण आम्ही त्यावेळी सर्वजण असुरक्षित होतो. याविषयी फार कमी जणांना माहिती आहे. एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या माहितीनुसार, मी माझ्य़ा मुलांवर जो अत्याचार झाला त्याविषयी एक पुस्तक लिहिणार आहे. सध्या ते प्रकरण न्यायालयीन प्रविष्ठ असल्यानं त्यावर अधिक भाष्य करता येणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे.

loading image
go to top