Anil Kapoor: अनिल कपूरने मानले दिल्ली पोलीसांचे आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kapoor gave thankstweet to Delhi Police for catching culprits behind Ahuja home robbery

Anil Kapoor: अनिल कपूरने मानले दिल्ली पोलीसांचे आभार

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी काही दिवसांआधी झालेल्या चोरीतील आरोपींना दिल्ली पोलीसांनी अटक केली असून दिल्ली पोलीसांच्या या कामगीरीचे अभिनेता अनिल कपूरने प्रशंसा करत त्यांचे आभार मानले आहे.अनिल कपूरने दिल्ली पोलीसांसाठी त्याच्या ट्वीटर अकांऊटला ट्वीट टाकले आहे.

अभिनेता अनिल कपूरने शुक्रवारी त्याच्या ट्वीटर अकाऊंटला दिल्ली पोलीसांसाठी एक संदेश शेअर केलाय.अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरच्या सासरच्या घरी चोरी झाल्याची बातमी चर्चेत होती.एकूण २.४ कोटींची रक्कम तीच्या राहत्या घरून चोरी झाल्याची तक्रार दिल्ली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.दिल्ली पोलीसांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत कारवाही सुरू केली आणि चोरीस जबाबदार गुन्हेगारांना अटक करण्यास यशस्वी ठरले.

सोनमच्या सासरच्या अमृता शेरगिल रोड येथील निवासस्थानातून त्यांच्या घरी काम करणाऱ्या परिचारीका व तीचा नवरा या दोघांनी मिळून तीच्या घरातील तब्बल २.४ कोटी रुप्यांचे दागिने आणि रोख रक्कमेची चोरी केली.गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनमच्या सासूचे चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक केली.देव वर्मा असे सराफाचे नाव असून तो कालकाजी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,त्यांनी देव यांच्याकडून १कोटींहून अधिक किमतीचे चोरलेले दागिने जप्त केले आहेत ज्यात १००हिरे,सहा सोन्याच्या साखळ्या, हिऱ्याच्या बांगड्या, एक डायमंड ब्रेसलेट, दोन टॉप आणि एक पितळी नाणे आहे. आरोपी दाम्पत्याने चोरीच्या रकमेतून खरेदी केलेली 'i-१०' कारही जप्त करण्यात आली असून पोलीसांचा तपास सुरूच आहे.

हेही वाचा: Sonam Kapoor; सोनम कपूरच्या सासरी चोरी करणारी नर्स पतीसह अटकेत

पोलिसांनी बुधवारी सोनमच्या निवासस्थानातील कर्मचारी 'अपर्णा रुथ विल्सन हिला तिचा पती नरेश कुमार सागर'सह सरिता विहार येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती.सोनमच्या घरातून फेब्रुवारीमध्ये 2.4 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे,सोनम तिच्या पती आणि सासरच्यांसोबत राहत होती.तीच्या ८६ वर्षीय सासूची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या नर्सने तिच्या अकाऊंटंट पतीसोबत घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरण्याचा कट रचला,असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Anil Kapoor Appreciate Delhi Police For Their Job In Solving Ahujasonam Kapoorhouse Robbery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..