Koffee With Karan 7: 'जॅकी श्रॉफमुळे मी नेहमीच..' अनिल कपूर बेधडकपणे बोलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan 7

Koffee With Karan 7: 'जॅकी श्रॉफमुळे मी नेहमीच..' अनिल कपूर बेधडकपणे बोलला

Anil Kapoor And Jackie Shroff: करण जोहरच्या कार्यक्रमातून वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होतात. करण त्यांना काही गंमतीशीर प्रश्न विचारुन बोलते करतो. अनेकदा त्यानं त्या सेलिब्रेटींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारुन हैराण केल्याचे दिसून आले आहे. करणनं यानिमित्तानं त्याच्या (Bollywood News) लाईफस्टाईलविषयी दिलेली माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. करण जोहरच्या सातव्या सीझनमध्ये आता प्रख्यात अभिनेता जॅकी श्रॉफ, आणि अनिल कपूर सहभागी झाले होते. यावेळी अनिल कपूरनं केलेल्या खुलाशानं चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

करणच्या त्या शोमध्ये अभिनेता वरुण धवन देखील सहभागी झाला होता. अनिल यांनी यावेळी त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळातील बॉलीवूडच्या आठवणींना उजाळा दिला. हा शो खासकरुन चर्चेत आला होता अनिल यांनी जॅकी श्रॉफ यांच्यावर केलेल्या कमेंटनं. अनिल त्यांच्याविषयी बोलताना भावूक झाले होते. आपल्या जुन्या मित्राच्या आठवणीत ते रमून गेले होते. काही प्रसंगाने आपलं आयुष्य बदलून गेलं होतं. त्यात एका मित्राच्या आठवणीनं आपल्याला कायम साथ केली. त्यामध्ये जॅकी श्रॉफ यांचे नाव घ्यावे लागेल.

मी माझ्या जॅकी मित्राबरोबर नेहमीच मस्ती केली. आमचं मैत्रही प्रसिद्ध होतं. त्या मैत्रीचे किस्से अजुनही सांगितले जातात. अशातच मला त्याच्याविषयी जे वाटू लागले ते वेगळे होते. जॅकी माझ्या चित्रपटामध्ये असणे यामुळे मला नेहमीच असुरक्षित वाटले. हे मला आवर्जुन सांगावेसे वाटते. तो एक ग्रेट अभिनेता आहे. यात वाद नाही. तो जेव्हा पडद्यावर असतो तेव्हा मात्र त्याचं अस्तित्व सगळीकडे जाणवतं. जॅकीसमोर उभे राहणे अवघड असते. अशी प्रतिक्रिया अनिल यांनी दिली होती.

अनिलला यावेळी करणनं नेपोटिझमवरुन प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला अनिलनं गांभीर्यानं घेतलं नाही. मला अशा प्रश्नानं काही फरक पडत नाही. मी केवळ माझ्या कामावर लक्ष देतो. ते जास्त महत्वाचे आहे. करिअरच्या सुरुवातीला एकाच व्यक्तीची भीती वाटली ती म्हणजे जॅकी श्रॉफ. असेही अनिलनं सांगितलं.