
Animal Teaser : 'बॉबी, अरे तू खातोस काय'? रणबीरही पडला तुझ्यापुढे फिका! 'अॅनिमलचा एनिमी' लूक भलताच रावडी
Animal Teaser Bobby Deol Look Fans Crazy Comment Dont : रणबीरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित त्या अॅनिमल चित्रपटाचा टीझर समोर आल्यानंतर एकच चर्चेला सुरुवात झाली. त्यात रणबीरच्या लूकनं प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र यासगळ्यात एका अभिनेत्यानं रणबीरच्या लूकला फिकं पाडले. सगळीकडे चर्चा होत आहे ती बॉबी देओलच्या त्या रावडी लूकची.(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉबीला जेवढी लोकप्रियता मिळाली नाही तेवढी ती त्याला आता मिळताना दिसत आहे. बॉबीनं वयाची पन्नाशी केव्हाच पार केली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तो बॉलीवूडमध्ये अॅक्टिव्ह असणारा कलाकार आहे. मात्र बराचवेळ तो बॉलीवूडपासून लांब असल्यानं त्याच्या वाट्याला म्हणावी अशी लोकप्रियता काही आली नाही.
बॉबीनं जेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम नावाच्या मालिकेमध्ये काम केले तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला. या मालिकेनं तो लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचला. त्यात बॉबीचा लूक, त्याची देहबोली आणि अभिनय यासाऱ्याची चर्चा व्हायला लागली. त्यानंतर त्यानं आणखी एका ओटीटीवरील चित्रपटात काम केले. बॉबीनं त्यात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ती देखील त्याच्या चाहत्यांना आवडली होती.
आता बॉबीनं रणबीरला लुकच्याबाबत फिकं पाडलं आहे. चर्चा होत आहे ती अॅनिमल मुव्हीची. त्यात बॉबी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर बॉबीनं त्याचा तो लूक आणि टीझर पोस्ट केला आहे. तो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी त्याला तू तर रणबीरपेक्षा भारीच दिसतो आहे. नेटकऱ्यांनी बॉबीला त्याच्या या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यात रणबीर कपूरनं महत्वाची भूमिका साकारली आहे. बॉबीची बहीण ईशा देओलनं देखील सोशल मीडियावर बॉबीसाठी खास पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं तुम्ही जर अॅनिमलचा टीझर पाहत असाल तर तो शेवटचा प्रसंग नक्की पाहा. असे म्हटले आहे. बॉबीनं देखील त्याच्या इंस्टावरुन तो लूक शेयर करुन नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे.