नाटक : 'अंक तिसरा' गाजला! 'आॅल द बेस्ट 2' च्या टीमने उडवली धमाल

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मराठी नाट्यरसिक जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरला आहे. जेथे जेथे मराठी माणूस आहे, तिथे मराठी नाटक नांदते. ही बाब लक्षात घेऊन ई सकाळने सुरू केले आहे नवे सदर. याचे नाव आहे अंक तिसरा. यामध्ये दर रविवारी होतील गप्पा एका नाटकाच्या कलाकारांशी आणि उलगडतील किस्से पदद्यामागचे. याची सुरूवात या रविवारपासून झाली. यावेळी आॅल द बेस्ट या नाटकाची टीम बोलती झाली. 

पुणे: मराठी नाट्यरसिक जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरला आहे. जेथे जेथे मराठी माणूस आहे, तिथे मराठी नाटक नांदते. ही बाब लक्षात घेऊन ई सकाळने सुरू केले आहे नवे सदर. याचे नाव आहे अंक तिसरा. यामध्ये दर रविवारी होतील गप्पा एका नाटकाच्या कलाकारांशी आणि उलगडतील किस्से पदद्यामागचे. याची सुरूवात या रविवारपासून झाली. यावेळी आॅल द बेस्ट 2 या नाटकाची टीम बोलती झाली. 

अंक तिसरा : आॅल द बेस्ट 2 : #Live 

या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक देवेंद्र पेम, अभिनेता मयुरेश पेम, मन्मित पेम आणि किरण रजपूत ही मंडळी या गप्पांमध्ये सहभागी झाली. यावेळी या नाटकाचा प्रवास तर त्यांनी उलगडून सांगितलाच, शिवाय नाटकावेळी एन्ट्री चुकल्याने झालेला गोंधळ, मन्मितच्या नकला, मयुरेशच्या विनोदांनी मात्र बहार आणली. दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनीही यावेळी या नाटकाची निर्मिती, दिग्दर्शन आणि पात्रनिवड याबद्दलचे निकष सांगितले. 

या गप्पांमधून मन्मितने आपला अभिनय प्रवास उलगडून सांगितलाच, शिवाय सध्या ज्या सिनेमामुळे त्याची सर्वत्र चर्चा होतेय, त्या कच्चा लिंबू या सिनेमातील भूमिकेबद्दलही तो बोलता झाला. या नाटकाने गाठलेल्या 200 व्या टप्प्याचे अनुभव मयुरेशने सांगितले, तर किरणने देवेंद्र आणि मयुरेश, मन्मितकडून घेतलेले धडे अधोरेखित केले. तब्बल दीडशे प्रयोग झाल्यानंतर किरणला देवेंद्र यांनी कशी शाबासकी दिली तेही सांगितलं. यावेळी ई सकाळच्या आॅनलाईन वाचकांनीही या मंडळींना शुभेच्छा दिल्या, तर काहींनी आपल्या मनातले प्रश्नही विचारले. निशांत घाटगे, सोनाली राऊत, स्वागत पाटणकर यांसह अनेक मंडळी या चर्चेत सहभागी झाली. 

Web Title: Ank tisara esakal initiative drama marathi