व्यायमात मिलींद सोमणला पत्नी अंकिताची अनोखी साथ...पाहा फोटो..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

दोघे नेहमीच एकत्र व्यायम करत असतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात.

अभिनेता मिलींद सोमण हा त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या शारिरीक तंदरुस्तीसाठीच जास्त ओळखला जातो. वयाच्या या टप्प्यावर देखील मिलींदचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. नुकतेच मिलींदची पत्नी अंकिताने त्याचे व्यायम करत असतानाचा मजेशीर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता नवऱ्याला व्यायम करण्यात मदत करताना दिसत आहे. 

या फोटोमध्ये मिलींद पुशअप करत आहे पण मजेशीर गोष्ट ही आहे की अंकिता मात्र त्याच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. हे जूने फोटो शेअर करत अंकिताने “या फोटोंमध्ये प्रेम आहे” असे कॅपशन दिले आहे. मिलींदप्रमाणेच अंकिता देखील तीच्या फिटनेसची खूप काळजी घेते. दोघे नेहमीच एकत्र व्यायम करत असतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.  लॉकडाऊनच्या काळात हे दोघे घरातच वेळ घालवत आहेत आणि या आधी देखील त्यांच्या सोबत व्ययम करतानाचे फोटो तसेच व्हिडीओ समोर आले आहेत. 

 

 

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, तरी त्यात काही सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे मिलींद-अंकिता हे दोघे जोडीने 75 दिवसांच्या कालावधीनंतर धावण्यासाठी घराबाहेर पडले होते, त्याचे फोटो देखील मिलींदने सोशल मिडीयावरती पोस्ट केले होते. या दोघांच्या वयामध्ये 26 वर्षांचे अंतर असल्याने सुरुवातील या जोडीवर टिका केली जात असे मात्र आता त्यांची जोडी वेळोवेळी हिट ठरताना दिसते. फक्त अंकिता आणि मिलींदच नाही तर मिलींदची आई उषा सोमण यांनी देखील वयाच्या 81 व्या वर्षीत फिटनेस सांभाळला आहे. हे तिघे मिळून व्यायम करत असतात त्यासोबतच इतरांना आरोग्यदायक जीवनशैली स्विकारण्यासाठी प्रेरणा देतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita konwar help her husband milind soman in workout 

Tags
टॉपिकस
Topic Tags: