
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मैत्रीण म्हणून प्रसिद्ध आहे. सुशांतच्या आत्महत्या नंतर तिने आपला जन्मदिन साजरा केला होता. त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळं ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आताही तिची अशाच प्रकारची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
मुंबई - अभिनेत्री अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मैत्रीण म्हणून प्रसिद्ध आहे. सुशांतच्या आत्महत्या नंतर तिने आपला जन्मदिन साजरा केला होता. त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळं ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आताही तिची अशाच प्रकारची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
आपल्या बद्दल कोण काय बोलत याची आपल्याला चिंता नसल्याचे अंकिताने म्हटले आहे. याबाबत तिचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. सुशांत आणि तिच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सर्व माध्यमावर झाली होती. सध्या तिनं आपल्या फॅन्स बरोबर एक लाईव्ह व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिनं आपण करत असलेल्या मेडिटेशनला नुकतंच एक वर्ष पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळं मला माझे मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवता आल्याची भावना तिनं व्यक्त केली आहे. लोकं नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाही असे नेहमी दिसून येते. यावेळी नाराज होण्यापेक्षा हताश न होता काम करत राहावे. ते जास्त महत्त्वाचे आहे.
अंकिताने 1 जानेवारी 2020 रोजी मेडिटेशन सुरू केले. त्याला आता पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. रात्री उशिरा झोपून उशिरा उठणाऱ्या अंकिताने आपल्याला मेडिटेशनने खूप फायदा झाल्याचे सांगितले. त्यामुळं शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहण्यास मदत झाली आहे. आता रोज पहाटे साडेचार वाजता दिवस सुरू होतो. त्यानंतर वॉकला सुरुवात होते. एका जागी बसून राहायला मोठी अडचण येत होती मात्र जेव्हा योगाला आणि ध्यानाला सुरुवात केली तेव्हा त्याचा मोठा फायदा झाला.
लाईव्ह सेशनवेळी अंकिताने आपल्यावर टीका करणाऱ्याना खडे बोल सुनावले. ती म्हणाली, लोकांना बोलायला काय जाते ? ते टीका करतच असतात. आपण त्यांना जास्त महत्व देत नाही. सुशांत प्रकरणातही मला प्रचंड मानसिक त्रास झाला. मात्र आता आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. मी आता ठीक आहे, लोक माझ्याविषयी काय म्हणतात याकडे फारशा गांभीर्याने घेत नाही. त्यांना माझे वागणे बोलणे पटत नसल्यास त्यांनी मला अनफॉलो केले तरी चालेल. उगाचच माझ्यावर कमेंट करून वेळ वाया घालवु नये.
Edited By - Prashant Patil