
इस्रायलच्या राष्ट्रगीतावरुन अनु मलिक ट्रोल; नेटकऱ्यांकडून चोरीचा आरोप
'इंडियन आयडॉल १२' हा रिअॅलिटी शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी या शोमधील स्पर्धक तर कधी परीक्षक चर्चेचा विषय ठरतात. सध्या 'इंडियन आयडॉल'चे परीक्षक आणि संगीतकार अनु मलिक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इस्रायलचा जिमनास्ट डोल्गोपयात (Dolgopayat) सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनु मलिकला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. कारण डोल्गोपयातच्या विजयानंतर इस्रायल देशाचं राष्ट्रगीत लावण्यात आलं आणि ते राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना 'दिलजले' या बॉलिवूड चित्रपटातील 'मेरा मुल्क मेरा देश' हे गीत आठवलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनु मलिकवर चोरीचा आरोप होत आहे. (Anu Malik Trolled as Israels National Anthem Plays at Tokyo Olympics slv92)
इस्रायलचं राष्ट्रगीत आणि 'मेरा मुल्क मेरा देश' या गाण्याच्या चालीत साम्यता आढळल्याने नेटकऱ्यांनी अनु मलिकला ट्रोल केलं आहे. दुसऱ्या देशाचं राष्ट्रगीत चोरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. 'दिलजले' या चित्रपटातील गाणी अनु मलिकने चालबद्ध केली होती. अनु मलिकवर याआधीही चालीच्या चोरीचा आरोप करण्यात आला होता. 'इस्रायलचं राष्ट्रगीतही कॉपी करण्यासाठी सोडलं नाही का', असा उपरोधिक सवाल एका नेटकऱ्याने केला. तर ऑलिम्पिकमध्ये संगीत चोरीचा कोणता खेळ असता तर त्यात अनु मलिकला सुवर्णपदक नक्की मिळालं असतं, अशी टीका दुसऱ्याने केली.
हेही वाचा: राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला कोट्यवधींचं नुकसान
अनु मलिकने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांतील गाणी संगीतबद्ध केली आहेत. 'छम्मा छम्मा', 'बाजीगर ओ बाजीगर', 'एली रे एली', 'तुमसे मिल के दिल का जो हाल' यांसारखी लोकप्रिय गाणी अनुने संगीतबद्ध केली आहेत.
Web Title: Anu Malik Trolled As Israels National Anthem Plays At Tokyo Olympics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..