अनुजा चव्हाण 'दादा एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बहीण भावाच्या नि:स्वार्थ नात्याची गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होते. ह्याच स्पर्धेच्या विजेत्याचं नाव आता जाहीर करण्यात आले आहे. अनुजा चव्हाण ही ह्या स्पर्धेची विजेता ठरली आहे.

मुंबई- बहीण भावाच्या नि:स्वार्थ नात्याची गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होते. ह्याच स्पर्धेच्या विजेत्याचं नाव आता जाहीर करण्यात आले आहे. अनुजा चव्हाण ही ह्या स्पर्धेची विजेता ठरली आहे.

ह्या नाटकाची आता तीच पहिली प्रेक्षक देखील ठरणार आहे. अनुजा ही ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. अनुजाला दादा, एक गुड न्युज आहे या नाटकाचे तिकीट ह्या नाटकातील कलाकार उमेश कामत, ऋता दुर्गुळे, दिग्दर्शक अद्वैत दादरकर, लेखिका कल्याणी पाठारे आणि ह्या नाटकाची सादरकर्ती प्रिया बापट ह्यांच्या हस्ते देण्यात आले.

ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर ह्यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. शिवाय आरती मोरे, ऋषी मनोहर ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले. नंतर हे नाटक आहे हे लोकांना समजले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anuj Chavan is the first audience of 'Dada Ek Good News ahe'