
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर अनुप जलोटा यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की त्यांच्यामध्ये केवळ गुरु शिष्याचं नातं आहे. मात्र आता दोघांचे असे काही फोटो समोर आले आहेत. ज्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे.
मुंबई- भजन सम्राट अनुप जलोटा आणि अभिनेत्री गायिका जसलीन मथारु यांची जोडी 'बिग बॉस सिझन १२' च्या वेळी चांगलीच गाजली. त्यावेळी दोघांच्या बाबतीत अनेक उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. दोघेही पार्टनर म्हणून त्या सिझन मध्ये दाखल झाले होते ज्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत राहिली. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर अनुप जलोटा यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की त्यांच्यामध्ये केवळ गुरु शिष्याचं नातं आहे. मात्र आता दोघांचे असे काही फोटो समोर आले आहेत. ज्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा: कंगनाच्या सिनेमातून २३ वर्षांनंतर सलमान खानची 'ही' अभिनेत्री करणार कमबॅक
सोशल मिडियावर अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांचे असे फोटो व्हायरल झाले आहेत जे बघून चाहते चक्रावले आहेत. या फोटोमध्ये दोघेही नव दाम्पत्यासारखे दिसत आहेत. अनुप जलोटा यांनी शेरवानी आणि नवरदेवाची पगडी घातली आहे तर जसलीन लग्नाच्या पेहरावामध्ये दिसतेय. दोघेही या फोटोमध्ये आनंदी दिसत आहेत. हे फोटो पाहून आता सोशल मिडियावर चर्चा होतेय की यांनी गुपचुप लग्न तर केलं नाही ना?
विशेष म्हणजे हे फोटो जसलीन मथारु हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर केले आहेत. तसंच चाहत्यांची उत्सुकता ताणुन धरण्यासाठी तिने फोटोंना कोणतीही कॅप्शन दिलेलं नाही. या फोटोवर चाहते लग्न झाल्याच्या शुभेच्छा देत आहेत तर कोणी त्यांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी स्टंट असल्याचं म्हटलंय तर काहींनी हा फिल्मी सीन असल्याचं अंदाज बांधलाय.
अनुप जलोटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर त्यांची तीन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीचं नाव सोनाली सेठ, दुसरीचं बीना भाटिया आणि तीसरीचं मेधा गुजराल आहे. मात्र ही तीनही लग्न यशस्वी होऊ शकली नाहीत. त्यानंतर त्यांनी इस्राईल मॉडेल रीना गोलनलाही डेट केलं होतं.
anup jalota and jasleen matharu wedding photo viral on social media