esakal | 'येणार तर मोदीच'; सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

बोलून बातमी शोधा

anupam kher

'येणार तर मोदीच'; सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाच्या कठीण काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. त्यांच्या या ट्विटला अभिनेते अनुपम खेर यांनी उत्तर दिलं असून त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय. 'घाबरू नका, येणार तर मोदीच', असं उत्तर अनुपम खेर यांनी शेखर गुप्तांना दिलं.

शेखर गुप्ता यांचं ट्विट

"युद्ध, नैसर्गिक आपत्ती, अन्नटंचाई अशा अनेक परिस्थिती मी पाहिल्या आहेत. मात्र फाळणीनंतरचं आपल्यासमोर हे सर्वांत मोठं संकट आहे. भारताने याआधी कधीच असं अकार्यक्षम सरकार पाहिलेलं नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. हा प्रशासनाचा अभाव आहे", अशा शब्दांत शेखर गुप्ता यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

अनुपम खेर यांचं उत्तर

'आदरणीय शेखर गुप्ताजी, हे जरा अतीच झालं. तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. कोरोना ही एक आपत्ती आहे, संपूर्ण जगासाठी. आपण याआधी कधीच या महामारीचा सामना केला नव्हता. सरकारवर टीका करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर टिकाटिप्पणी करा, पण कोरोनाचा सामना करणं आपल्या सर्वांचीही जबाबदारी आहे. तसं घाबरू नका, येणार तर मोदीच,' अशा शब्दांत खेर यांनी उत्तर दिलं.

अनुपम खेर हे अनेकदा सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उघडपणे समर्थन करताना दिसतात. याआधीही ते ट्विटरच्या माध्यमातून मोदींची पाठराखण करताना दिसले.