esakal | मुंबईत आजही मी भाड्याच्या घरात राहतो- अनुपम खेर
sakal

बोलून बातमी शोधा


bollywood actor anupam kher

मुंबईत आजही मी भाड्याच्या घरात राहतो- अनुपम खेर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की आलिशान घरं, महागड्या गाड्या अशी संपत्ती असेल असं सर्वसामान्य गृहीत धरतात. पण ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर Anupam Kher यांच्याबाबतीत असं नाहीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं की, मुंबईत त्यांचं हक्काचं एकही घर नाही. ते सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांच्या मालकीचं एकच घर शिमलामध्ये असून ते आई दुलारी खेर Dulari Kher यांच्यासाठी घेतल्याचं अनुपम यांनी सांगितलं. "माझं मुंबईत मालकीच एकही घर नाही. मी भाड्याच्या घरात राहतो. चार-पाच वर्षांपूर्वीच मी मुंबईत घर न घेण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या हक्काचं एकच घर शिमल्यात आहे. चार वर्षांपूर्वी मी ते घर आईसाठी घेतलं होतं", असं ते म्हणाले.

अनुपम यांची आई दुलारी या शिमलामध्ये अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहिल्या होत्या. तिथे हक्काचं घर असावं अशी त्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. शोघीमध्ये दुलारी यांना एक घर फार आवडलं होतं. बाहेरून प्रवेशद्वार असलेलं ते एक छोटंसं घर पुढे होतं. मात्र पुढे त्याला नऊ बेडरुम होते. आईला काहीतरी अनोखी भेट द्यावी अशी अनुपम खेर यांची इच्छा होती. घराच्या मालकाला त्यांनी विचारलं की संपूर्ण घर ते विकायला तयार आहेत का? आईला नंतर त्यांनी इतरही खोल्या दाखवल्या आणि त्यांना ते घर खूप आवडलं. तेव्हा अनुपम यांनी आईला सांगितलं की त्यांनी संपूर्ण घर विकत घेतलं आहे. त्यावर "तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मला इतकं मोठं घर नकोय", असं म्हणत त्या अनुपम खेर यांच्यावर ओरडल्या.

हेही वाचा: लेकीच्या हाती आला बाबांचा कॅमेरा.. 'होम मिनिस्टर'च्या टीमसाठी भावूक क्षण

अनुपम खेर हे सध्या अमेरिकेत 'जिंदगी का सफर' या शोची शूटिंग करत आहेत. या शोमध्ये ते चित्रपटसृष्टीतील त्यांचा अनुभव सांगतात. नुकतंच त्यांनी करिअरमधील ५१९ व्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 'शिव शास्त्री बल्बोआ' असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये नीना गुप्ता यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

loading image
go to top