'देसी हॅरीपॉटर' सोशल मिडियावर व्हायरल, अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडिओ

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 17 December 2020

अनुपम खेर यांनी एक असा व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहुन चाहत्यांना त्यांचं हसू आवरता येणार नाही. अनेकजण हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत व्हायरल करत आहेत. 

मुंबई- दिग्गज अभिनेते अनुपम खेर सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. ते अनेकदा काही ना काही पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची आई दुलारी तर सोशल मिडिया स्टार बनली आहे. आता तर अनुपम खेर यांनी एक असा व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहुन चाहत्यांना त्यांचं हसू आवरता येणार नाही. अनेकजण हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत व्हायरल करत आहेत. 

हे ही वाचा: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक 

एक माणुस त्याच्या स्कुटीवरुन कुठेतरी जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो झाडूवर बसला आहे. आता हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी त्या माणसाला 'देसी हॅरीपॉटर' असं म्हटलं आहे. त्यांच्या नजरेत हा 'भारतातील कमी बजेट असलेला हॅरी पॉटर' आहे. जेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तेव्हापासून यावर अशा एकापेक्षा एक कमेंट्स पाहायला मिळतायेत की सगळेच हसून हसून लोटपोट होत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलंय, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर Hogwarts नक्कीच बंद होईल. तर दुस-या युजरने म्हटलंय, तुमच्यामुळे आता हा हॅरी पॉटर प्रसिद्ध झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांच अशा व्हिडिओवर प्रतिक्रिया देणं हे काही हैराण करण्यासारखं नाहीये कारण ते अनेकदा असंच काहीतरी हटके शेअर करत असतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांचं केवळ मनोरंजनंच होत नाही तर ते अनुपम खेर यांची स्तुती देखील करतात. अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या नवीन पुस्तकामुळे चर्चेत आहेत. त्यांनी लॉकडाऊनमध्ये 'युअर बेस्ट डे इज टु़डे' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. कोरोना काळात झालेल्या संघर्षावर आधारित या पुस्तकाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.   

anupam kher shares funny video harry potter going viral loving it  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anupam kher shares funny video harry potter going viral loving it