esakal | भाजपाच्या जाहिरनाम्याची अनुराग कश्यपने उडवली टर
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Kashyap On Bjp Manifesto Bihar Election

 बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.

भाजपाच्या जाहिरनाम्याची अनुराग कश्यपने उडवली टर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिहारमधल्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यावरुन इलेक्शन फिव्हर तयार होऊ लागला आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यावरुन लगेचच वादाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांतून चर्चेला तोंड फुटले. यात अनेकांनी त्यांच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याने त्या जाहिरनाम्यावर आगपाखड केली आहे. वादा तेरा वादा अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यामधील एक आश्वासन सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाची लस मोफत देण्यात येईल, असं आश्वासन भाजपाने दिलं आहे. त्यांच्या या आश्वासनावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने प्रतिक्रिया दिली. त्याने राजेश खन्ना यांच्या ‘दुश्मन’ चित्रपटातील ‘वादा तेरा वादा’ या गाण्याचा व्हिडाओ ट्विट करुन भाजपावर उपरोधिक टोला लगावला आहे.

बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.भाजपाच्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार, मेडिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार, ३ लाख शिक्षकांची भरती करणार, बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार, १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार, एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार, दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची उभारणी याशिवाय धान्य आणि गहूसोबत सरकार डाळीही विकत घेण्याचे, २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.