esakal | #MeToo: वडिल अनुराग कश्यप यांच्यावरील आरोपावर आलियाची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

anurag kashyap, aaliyah kashyap

#MeToo: वडिल अनुराग कश्यप यांच्यावरील आरोपावर आलियाची प्रतिक्रिया

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची (anurag kashyap) मुलगी आलिया कश्यप (aaliyah kashyap) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनुरागसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने स्वत;चे युट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे. या चॅनलमधील तिच्या अनुरागसोबतच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. गेल्यावर्षी अनुरागवर मी #MeToo चे आरोप केले गेले होते. त्यावर नुकतचं आलियाने आपलं मतं मांडले आहे. (anurag kashyap daughter aaliyah say about metoo allegations against him)

मुलाखतीमध्ये आलिया म्हणाली, 'जे लोक माझ्या वडिलांना ओळखतात त्यांना माहित आहे की माझे वडिल 'टेडी बियर' सारखे आहेत त्यांच्यावरील #MeToo च्या आरोपाने मला खूप त्रास झाला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाला चूकीच्या पद्धतीने दाखण्यात आले. लोकांना वाटते की ते एक वाईट माणूस आहेत. पण मी जर कोणत्या जवळच्या व्यक्तिला विचारले तर ते मला असेच सांगतील की माझ् वडिल सॉफ्ट टेडी बियरसारखे आहेत. खरं तर मला या गोष्टीचा द्वेष वाटण्याऐवजी काळजी वाटते. मला माहित आहे की लोक त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलतात. त्या लोकांकडे आयुष्यात काही तरी चांगले करायला नाही. माझे वडिल या गोष्टी माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना मला चिंतेत आणि काळजीत पाहायचे नाही.'

हेही वाचा: 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मधील शमिकाची लव्ह स्टोरी

'फादर्स डे'ला अनुरागसाठी आलियाने लिहीलेल्या ब्लॅगने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. आलियाने तिच्या वडिलांना विचारले होते की 'जर मी प्रेग्नंट असेल तर तुम्ही काय कराल?' तेव्हा अनुरागने उत्तर दिले, 'मी ही गोष्टीला स्विकारेन. तिला साथ देईन'

हेही वाचा: Toofan Review; 'तुफान' एक छोटीशी वावटळ!

loading image