अनुराग कश्यपला पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कल्कीचा पाठिंबा, म्हणाली 'तु महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आला आहेस..'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 21 September 2020

एकीकडे अनेक कलाकार अनुरागला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे काही कलाकार त्याला अटक करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान अनुराग कश्यपची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कल्किने त्याचं समर्थन केलं आहे.

मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये दोन गट पडलेले दिसून आले. एकीकडे अनेक कलाकार अनुरागला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे काही कलाकार त्याला अटक करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान अनुराग कश्यपची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कल्किने त्याचं समर्थन केलं आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

अभिनेत्री कल्कीने अनुराग कश्यपसोबत २०११ मध्ये लग्न केलं होतं. मात्र २०१५ मध्ये हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. कल्किने अनुराग कश्यपचं समर्थन करत सोशल मिडियावर भली मोठी पोस्ट लिहिली आहे तसंच त्याच्यावरिल आरोपांवर टिका देखील केली आहे.

कल्किने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. 'प्रिय अनुराग, या मिडिया सर्कसचा तुझ्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. तुम्ही महिलांच्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या स्क्रीप्ट्सच्या माध्यमातून लढत आला आहात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात त्यांच्या प्रामाणिकपणाचं रक्षण केलं आहे. मी याचा पुरावा आहे. तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात मला नेहमी तुमच्या बरोबरीचं मानलं. घटस्फोटानंतरही तुम्ही माझ्या प्रामाणिकपणासाठी उभे राहिलात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@anuragkashyap10

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

कल्कीच्या या भल्यामोठ्या पोस्टमध्ये तिने शेवटी म्हटलंय की, 'तुम्ही मोठेपणा सोडू नका. ताकदीने उभा राहा आणि जे काम करत आहात ते करत राहा. पूर्व पत्नीकडून प्रेम'. कल्कीने अनुरागसाठी लिहिलेली ही नोट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याआधी अनुराग कश्यपची पहिली पत्नी अंजली बजाजनेही त्याचं समर्थन करत सोशल मिडियावर पोस्ट केली होती. तिने तिच्या पोस्टमध्ये अनुरागला रॉकस्टार म्हटलं होतं.   

anurag kashyap ex wife kalki koechlin come to support him after harassment allegation on him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anurag kashyaps ex wife kalki koechlin come to support him after harassment allegation on him