Virat-Anushka Wedding Anniversary: विराट-अनुष्कानं 'या' खास अंदाजात साजरा केला लग्नाचा सहावा वाढदिवस!

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला.
 Anushka Sharma And Virat Kohli  Wedding Anniversary:
Anushka Sharma And Virat Kohli Wedding Anniversary: Esakal

Anushka Sharma And Virat Kohli Wedding Anniversary: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय कपल आहे. विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2023 रोजी लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये इटलीमध्ये गुपचूप लग्न केले होते.

तिने लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. एका खाजगी सोहळ्यात जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले होते. या दोघांना एक मुलगी आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने लग्नाच्या सहाव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन जोरात केले. या खास प्रसंगाची झलक त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

 Anushka Sharma And Virat Kohli  Wedding Anniversary:
Animal Bobby Deol: 'जमाल कुडू' डान्स स्टेप्स बॉबी देओलला कशी सुचली? वाचा हा भन्नाट किस्सा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे. यावेळी दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. अनुष्काने विराटला मिठी मारली आणि विराटनेही हसत पोज दिली आहे. अनुष्काने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, तर विराट काळ्या शर्टमध्ये दिसला.

 Anushka Sharma And Virat Kohli  Wedding Anniversary:
Bharat Jadhav Birthday:'गोड गोजिरी' गाण्यामुळे तुटणार होती भरत - केदारची मैत्री! 'सही रे सही' नाटका दरम्यानचा भन्नाट किस्सा वाचा

फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले, “एक दिवस प्रेम, मित्र आणि कुटुंबाने भरलेला. इस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी उशीर झाला? 6+ वर्षे.' तर विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी शेयर केला आहे. तर त्यांच्या सेलिब्रेशनमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात विराट आणि अनुष्का त्यांचे मित्र आणि कुटुंबासह केक कापताना दिसत आहेत. यात अनुष्काचा भाऊ, निर्माता कर्णेश शर्मा, अभिनेता सागरिका घाटगे आणि स्टँड-अप कॉमेडियन अभिषेक उपमन्यु देखील दिसत आहे.

विराट आणि अनुष्काचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यात चाहते दोघांचेही कौतुक करत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com