Anushka Sharma Birthday: हिला चित्रपटात घेऊ नकोस.. असं म्हणाला होता करण जोहर पण नंतर तोंडावर पडला, कारण..

अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊया हा खास किस्सा..
Anushka sharma was rejected by karan johar for Rab Ne Bana Di Jodi film birthday story
Anushka sharma was rejected by karan johar for Rab Ne Bana Di Jodi film birthday storysakal

Anushka Sharma Birthday: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे, सडेतोड प्रतिक्रियांमुळे चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं आणि हटक्या स्टाईलनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनुष्काचा आज वाढदिवस.

आज अनुष्का 35 वर्षांची झाली असून 36 व्या वर्षात पदार्पण करत आहे. तीच्या अनेक बीग बजेट चित्रपटातून तीने कमी वेळात चित्रपट क्षेत्रात चांगले नाव कमावले. मॉडेलींगपासून या अभिनेत्रीने तीच्या करियरची सुरूवात केली होती. आज जरी ती यशाच्या शिखरावर असली तरी एक वेळ अशी होती की टिळा करण जोहरने नाकारले होते. पण नंतर त्याने त्याबद्दल माफी ही मागितली होती. तोच किस्सा आज जाणून घेणार आहोत..

(Anushka sharma was rejected by karan johar for Rab Ne Bana Di Jodi film birthday story)

Anushka sharma was rejected by karan johar for Rab Ne Bana Di Jodi film birthday story
Kiran Mane: किरण माने आणि रोहित पवार यांची बारामतीत खास भेट, म्हणाले..

'रब ने बना दी जोडी' हा अनुष्काकचा (anushka sharma) पहिलाच चित्रपट. आणि याच चित्रपटासाठी जेव्हा आदित्य चोप्राने अनुष्काची निवड केली तेव्हा पहिला हस्तक्षेप घेणारा कारण जोहरच होता. त्यावेळी करणचांगलाच नाराज होता.

आदित्यला त्यावेळी 'तू वेडा आहेस का?या मुलीला घेऊ नकोस', असा सल्ला करणने आदित्यला दिला होता. पण करणच्या सल्ल्यानंतरही आदित्यचा अनुष्काला चित्रपटात ठेवण्याचा निर्णय ठाम होता. पुढे अनुष्काने आपल्या कामाने सगळ्यांचीच मनं जिंकली. तिच्या दमदार अभिनयाने करण देखील अवाक झाला. आणि त्याने केलेल्या विधानाचा त्यालाच पश्चाताप झाला. याबाबत त्याने माफीही मागितली होती. करण जोहरनं स्वत: एका मुलाखतीत हा किस्सा सांगितता होता.

करण जोहर म्हणाला होता, 'मी आदित्यला अनुष्का शर्माला चित्रपटात कास्ट करू नये यासाठी खूप प्रयत्न केले. आदित्यने मला अनुष्काचे फोटो दाखवले ज्यावर मी त्याला म्हणालो की तू वेडाआहेस का? पण नंतर तिने सगळे समज खोटे ठरवले.

पुढे तो म्हणाला, ''रब ने बना दी जोडी'च्या शूटिंगदरम्यान, अनुष्का वधूच्या गेटअपमध्ये बसली होती आणि हा तिचा पहिला शॉट होता, जो पाहून माझ्या आईने मला सांगितले की, ती कुठेतरी हरवल्यासारखी दिसत आहे. पण नंतर तिने हा चित्रपट अक्षरशः गाजवला.' असा हा किस्सा आहे.

अनुष्काचा हा चित्रपट यशस्वी झालाच पण त्यानंतर तिनं चुकूनही मागे वळून पाहिलं नाही. याचि त्रपटानंतर अनुष्काचे अनेक चित्रपट आले .आज ती बॉलीबूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.अनुष्का शर्मा आज प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर ती निर्माती सुद्धा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com