म्हणून अनुष्का वापरते विराटचे कपडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि अभिनेत्री अनुष्का ही जोडी कायमच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि अभिनेत्री अनुष्का ही जोडी कायमच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनुष्काच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा हे दोघेही चर्चेत आले आहेत. अनुष्काने एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मी चक्क विराटचे कपडे वापरते असे म्हटले आहे. यामुळे या जोडीच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधान आले आहे.

अनुष्का आणि विराटची जोडी अर्थात विरुष्का या नावाने प्रसिद्ध असून विशेषत: समाजमाध्यमावंर या दोघांची जोडी सतत चर्चेत असते. त्यांचे फोटोजला देखील चाहत्यांची विशेष पसंती मिळत असते. दरम्यान अनुष्काला तिच्या फॅशन सेन्सबद्दल विचारले असता, तिने मी अनेकदा विराटचे टी-शर्ट आणि इतर कपडे वापरते असे सांगितले.  विराटला देखील माझी ही सवय आवडत असल्याने मी त्याचे कपडे वापरते असेही तिने म्हटले आहे.

web title : anushka Wears virats cloths


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka Wears virats cloths