'हवंय सगळ्यांना 'ते' मागण्याची हिंमत कुणाचीच नाही'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हवंय सगळ्यांना 'ते' मागण्याची हिंमत कुणाचीच नाही'...

'हवंय सगळ्यांना 'ते' मागण्याची हिंमत कुणाचीच नाही'...

मुंबई - ओटीटीवर ott दररोज वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि मालिका येताना दिसत आहे. त्याची एक वेगळी ट्रीट प्रेक्षकांना मिळताना दिसत आहे. केवळ मनोरंजनच entertainment नाही तर त्याबरोबर प्रबोधनही करण्याचं काम काही मालिका आणि चित्रपट करताना दिसत आहे. प्रेक्षकांना आता हवी ती वेबसीरिज हव्या त्या वेळेत पाहण्याची सोय ओटीटीनं करुन दिली आहे. असे असताना त्यांना मिळणारा कंटेट हा तितक्या दर्जाचा नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे प्रेक्षकही सरसकट मालिका आणि चित्रपट पाहण्यापेक्षा काही वेगळं पाहण्याचा आग्रह धरताना दिसत आहे. असाच एक चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर trailer viral व्हायरल झाला आहे. त्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयांवर आधारित हा चित्रपट आहे.

लैंगिक sex education विषयावर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट आहेत. अशीच एका हटक्या विषयांवरचा चित्रपट सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी आयुषमान खुराणानं विकी डोनरमध्ये स्पर्म डोनेट विषयांवर त्यानं चित्रपट केला होता. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा भाऊ अपारशक्ति खुराणा हा हेल्मेट नावाच्या एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. लैगिकता आणि त्याच्याशी संबंधित सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शहरात लैंगिकतेविषयी असणारी मानसिकता आणि तिच गावांतली यातला मुख्य फरकही या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे.

एखाद्या मेडिकल मधून कंडोम condom विकत घेणं ही अजूनही अनेकांसाठी वेगळी गोष्ट ठरते. त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमजही समाजात दिसून येतात. त्यावर वेगळ्या पद्धतीनं भाष्य करण्याचं धाडसं या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकानं दाखवलं आहे. यापूर्वी अशा विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांना या विषयांवरील चित्रपट आणि मालिका पाहण्याची इच्छा आहे मात्र त्याचे सादरीकरण प्रभावी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: लसीकरण झालेल्या डॉक्टरांनाच कोरोना ते ट्विटरनं बदलली प्रायव्हसी पॉलिसी

हेही वाचा: तालिबानी आले, अफगाणिस्तानातील प्रसिद्ध गायिकेनं सोडला देश

अपारशक्तिचा हेल्मेट नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्या ट्रेलरमध्ये असे दाखविण्यात आले की, अपारशक्ति हा लकीची भूमिका साकारतो आहे. तो एका दुकानात कंडोम घेण्यासाठी जातो. तेव्हा त्याला कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं हे दाखविण्यात आले आहे. लकी हा एका छोट्या गावात राहणारा व्यक्ती आहे. गावपातळीवर अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. हे त्या ट्रेलरमधून दाखवण्यात आले आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमानी यांनी केलं आहे.

Web Title: Aparshakti Khurana Pranutan Bahl Film Helmet Based On Condom Taboo Watch Trailer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..