Marathi Bigg Boss 4: सध्या बिग बॉसचा सीजन संपला असला तरी या शोची चर्चा काही थांबयला मागत नाहीय. 100 दिवस या घरात जिच्या आवाजाने दणका उठवला होता अशी हर हुन्नरी अपूर्वा नेमळेकर बाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या खेळात शेवटच्या दोन स्पर्धकांपैकी ती एक ठरली. तिला या खेळात विजेतेपद मिळालं नसलं तरी त्यापेक्षा मोठी गोष्ट तिने कमावली आहे. याविषयीच तिने सकाळच्या मुलाखतीत सांगितले आहे.
(Apurva Nemlekar said she debut in mahesh manjrekar's film soon in sakal interview)
मी जे बोलते ते मि करूनच दाखवते म्हणणाऱ्या लेडी ऑफ वर्डस्.. अपूर्वा यंदा बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक मनोरंजन करणारी स्पर्धक ठरली. अपूर्वाची 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता भूमिकेमुळे जनमानसात आधीपासूनच क्रेझ होती. ती या खेळाने अधिकच वाढवली. अपूर्वाचा खेळ आणि स्पष्ट, रोखठोक वागणूक पाहून अपूर्वाच विजेती होणार असे सर्वांना वाटले होते, पण तसे झाले नाही. या खेळात अक्षय केळकर ने बाजी मारली. पण अपूर्वाला मात्र एक मोठं यश मिळालं.
'इ-सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारले गेले की, शेवटच्या आठवड्यात मांजरेकरांनी तुझे भरपूर कौतुक केले. पण निकालानंतर ते तुझ्याशी काही बोलले का? त्यावर अपूर्वाने एक आनंदाची बातमी 'सकाळ'च्या मुलाखतीत सांगितली.
ती म्हणाली, 'मी या खेळात जिंकू शकले नाही, पण मांजरेकरांनी माझं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, तु ज्या पद्धतीने खेळली ते सर्व मी पाहिलं आहे. एक कलाकार म्हणून, एक स्पर्धक म्हणून तू उत्तम खेळलीस. एक दिग्दर्शक म्हणून मी जे पाहायचं ते नक्कीच तुझ्यात हेरलं आहे. त्यामुळे लवकरच आपण एकत्र सिनेमा करूया,असं मांजरेकर म्हणाले. ही ऐकून मी अक्षरशः धन्य झाले.' असे अपूर्वा म्हणाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.